राज्य आयोगाकडून २९ महापालिका निवडणुकींची घोषणा करण्यात आली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे तर १६ जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. तर दुसरीकडे नगर परिषदेची निवडणूकही सुरू आहे. या निवडणुकीसाठी राजकीय पक्षातील नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. सध्या पंढरपूरच्या मंगळवेढ्यात रणधुमाळी सुरु आहे. मंगळवेढा नगर परिषदेतील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी भाजप महिला नेत्या चित्रा वाघ यांनी आज हजेरी लावली. मात्र त्यांनी प्रचारादरम्यान एक वादग्रस्त केले त्यामुळे नवा वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. काय म्हणाल्या चित्रा वाघ? पंढरपुरातील मंगळवेढा नगरपरिषदेची निवडणूक सुरू आहे. यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. भाजप आमदार चित्रा वाघ या प्रचार करताना दिसत आहेत. चित्रा वाघ यांनी आज मंगळवेढ्याला भाजप उमेदवार सुप्रिया जगताप यांच्या निवडणूक प्रचाराला हजेरी लावली. यादरम्यान त्यांनी खा कुणाचंही मटण, पण कमळाचं दाबा बटण, असं वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर वाद उफाळून येण्याची शक्यता आहे. विरोधकांकडून जोरदार टीका लोकप्रतिनिधी असलेल्या चित्रा वाघ यांनी केलेल्या वक्तव्याने विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे. विरोधकांच्या मागणीनंतर निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.