Asaduddin Owaisi | अकोल्यातील गडंकी भागातील झुल्फिकार अली मैदानावर एमआयएम नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ओवेसी उमेदवारांच्या प्रचार सभेत आले होते. परंतु सभेदरम्यान मोठा गोंधळ होऊन चेंगराचेंगरी झाल्याचे पाहायला मिळाले. असदुद्दीन ओवेसी यांनी सभेतील भाषणात बोलताना लोकांना व्यासपीठाकडे येण्याचे आवाहन केलं. त्यानंतर सभा संपत असताना सर्व जमाव ओवेसी यांना भेटण्यासाठी व्यासपीठाकडे येत असल्याने हा गोंधळ उडाला. शेकडो लोक एकाच वेळी पुढे सरकल्याने सभास्थळी चेंगराचेंगरीसारखी स्थिती निर्माण झाली. ओवेसी यांच्या वर्तनावर टीकेची झोड जमाव नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांना सभेत लाठीचार्ज कारवा लागला. यावरून आयोजकांकडून योग्य नियोजन व नियंत्रणाचा अभाव असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं. मात्र यावेळी ओवेसी यांनी पोलिसांच्या गराड्यातून कारमध्ये बसून सुरक्षित स्थळ गाठलं. या प्रकारामुळे ओवेसी यांच्या वर्तनावर टीकेची झोड उठली आहे. बेजबाबदार आवाहनामुळेच हा गोंधळ उडाल्याचा आरोप स्थानिक नागरिक व विरोधी पक्षांकडून केला जात आहे. Asaduddin Owaisi | ओवेसी यांची सरकारवर टीका या प्रचार सभेत बोलताना ओवेसी यांनी सरकारवर सडकून टीका केली आहे. “अकोल्यात जन्म आणि मृत्यू दाखला देणे बंद केले. भाजप मुस्लिमांचा किती राग करते हे यातून दिसतयं. मुस्लिमांना दाखला देण्यासाठी फडणवीस-शिंदे-अजित पवार यांचे डोकं का दुखतं? गरीब भागांचा विकास करतांना हे आंधळे झालेत का? मुस्लिम आणि दलितांकडे इतके दुर्लक्ष का? असा सवाल ओवेसींनी यावेळी केला. याशिवाय ओवेसी यांनीआमच्या लोकांना अकोल्यात निवडून द्या. आम्ही दुर्लक्षित भागात विकास करू,” असं आश्वासन देखील दिलं. दरम्यान, एमआयएम अकोल्यात 37 जागांवर निवडणूक लढत आहे. Asaduddin Owaisi | हेही वाचा: Pune Weather: १३ अंशांच्या पुढे गेलं तापमान; ढगाळ हवामानामुळे थंडीचा जोर कमी