Asaduddin Owaisi | व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो व त्यांच्या पत्नी सीलिया फ्लोरेस यांना अमेरिकेच्या डेल्टा फोर्सने शनिवारी पहाटे ताब्यात घेतले. अमेरिकेने मोहीम सुरू असताना व्हेनेझुएलावर हवाई हल्लाही केला होता. या पार्श्वभूमीवर एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आवाहन केले आहे. जर डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्याच देशातून ताब्यात घेऊन अमेरिकेला नेऊ शकतात, तर तुम्हीही मुंबईवर झालेल्या २६/११ हल्ल्यातील मुख्य सूत्रधारांना उचलून आणा, दहशतवादी मसूद अजहर किंवा लष्कर-ए-तय्यबाच्या म्होरक्यांना भारतात आणा, असे आवाहन ओवैसी यांनी केले आहे. मुंबईमध्ये शनिवारी एका जनसभेला संबोधित करताना ओवेसी म्हणाले, “नरेंद्र मोदीजी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस, जर ट्रम्प आपले सैन्य पाठवून व्हेनेझुएलामधून तिथल्या अध्यक्षांना उचलू शकतात, तर मोदीजी ५६ इंचाची छाती आहे, तर पाकिस्तानात घुसून २६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड मसूद अजहर आणि लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांना उचलून भारतात आणा. जर ट्रम्प करू शकतात, तर आपण काय कमी आहात का? ट्रम्प करू शकतात तर आपल्यालाही करावेच लागेल,” असेही ओवेसी म्हणाले. Asaduddin Owaisi | अमेरिका-व्हेनेझुएलामधील वाद नेमका काय आहे? व्हेनेझुएलामधून अमेरिकेत मोठी ड्रग्ज तस्करी होत असल्याचा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. मात्र व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी अमेरिकेचे ड्रग्ज तस्करीचे सर्व दावे फेटाळून लावले आहेत. यादरम्यान त्यांनी व्हेनेझुएलावर अनेक निर्बंधदेखील लादले आहेत. गेल्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाची हवाई हद्द बंद करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर अखेर व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेत आणले गेले आहे. Asaduddin Owaisi | हेही वाचा: “मुलुंडचे ना*** पोपटलाल बिनविरोध..”; राऊतांची सोमय्यांवर आक्षेपार्ह शब्दांत टीका; म्हणाले “मुंबईवर…”