PMC Election Results 2026 | पुण्यातील प्रभाग क्रमांक ३६ (क) मधून भारतीय जनता पक्षाकडून सर्वात तरुण उमेदवार ठरलेल्या सई थोपटे यांचा विजय झाला आहे. सई थोपटे सध्या पुण्यातील नामांकित सिम्बायोसिस महाविद्यालयमध्ये बीबीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. कॉलेजचा वर्ग सुरू असतानाच त्यांना पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली होती. विद्यार्थिनी असतानाच थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरून विजय मिळवणारा हा क्षण सई थोपटे यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरलायं. PMC Election Results 2026 | सई थोपटे यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पुण्यात वेगवेगळे विषय, कार्यक्रम आणि आंदोलनांमध्ये तिने सहभाग नोंदवला होता. कॉलेजमध्येही त्यांनी तरुणांच्या प्रश्नावर आवाज उठवला आणि ठाम भूमिका मांडली होती. सई थोपटे राजकारणात नवख्या असल्या तरी त्यांचे वडील प्रशांत थोपटे हे मागील अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. पर्वती विधानसभा मतदारसंघात त्यांनी उपाध्यक्ष, सरचिटणीस, विधानसभा निवडणूक संयोजक अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्यात. पर्वती, सहकारनगर, धनकवडी परिसरात भाजप पक्ष लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशांत थोपटे यांनी केलं. पर्वतीच्याा आमदार माधुरी मिसाळ यांनी थोपटे कुटुंबीयांची भाजपसोबत असलेली एकनिष्ठात पाहून सई थोपटे यांना पुणे महानगरपालिकेसाठी उमेदवारी देण्यात आल्याचे म्हटले जाते. आता त्यांची या विजयाने पुण्याला सर्वात तरुण नगरसेवक मिळाला आहे. सई थोपटे यांच्यासह सहकारनगर पद्मावती 36 भाजपाचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. महेश वाबळे भाजप 5000 मतांनी विजय भोसले शैलजाभाजप 2595 मतांनी विजय सई थोपटे भाजप 2400 मतांनी विजय विना घोष भाजप 4000 मतांनी विजय तर आबा बागुल, अश्विनी कदम, सुभाष जगताप यांचा येथून मोठा पराभव झाला आहे.