Navneet Rana | भाजप नेत्या आणि माजी खासदार नवनीत राणा यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नवनीत राणा यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणातून माझगाव न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. माझगाव येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. ए. कुलकर्णी यांनी राणा यांचा दोषमुक्तीचा अर्ज मंजूर केला. तर नवनीत राणा यांचे वडील हरभजनसिंग कुंडलेस यांच्याविरुद्धचे प्रकरण सुरू असून, त्यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यासाठी न्यायालयाने सुनावणी १६ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली. काय आहे नेमकं प्रकरण? नवनीत राणा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राणा यांनी शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. यावेळी राणा यांच्या वडिलांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवून नवनीत यांना निवडणूक लढवण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. याप्रकरणी मुलुंड पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. तर उच्च न्यायालयातही जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेणारी याचिका दाखल करण्यात आली होती. Navneet Rana | भाजपच्या तिकिटावर अमरावती लोकसभा जागेवरून पराभव याप्रकरणी न्यायालयाने २०२१ मध्ये राणा यांना मिळालेले जात प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांच्या आधारे आणि फसवणूक करून मिळवण्यात आल्याचे स्पष्ट करून रद्द केले होते. मात्र, एप्रिल २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राणा यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र पुन्हा वैध ठरवले आणि त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची परवानगी मिळाली होती. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, भाजपच्या तिकिटावर अमरावती लोकसभा जागेवरून २०२४ च्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. Navneet Rana | हेही वाचा: मनसेचे मुख्यमंत्री फडणविसांना पत्र; ‘या’ तीन मागण्या करत म्हणाले, “सत्ता मिळवण्यासाठी…”