Ashok Kharat Case : बहुचर्चित भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाकडे राज्याचे लक्ष आहे. या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून धक्कादायक माहिती समोर येत होती. अशातच आता एक मोठी माहिती समोर आली आहे. अखेर एसआयटी चौकशीत अशोक खरातने चमत्कार आणि वशीकरण नव्हे तर हातचलाखीने महिलांना धमकवल्याची तसेच शोषण केल्याची माहिती दिली असल्याची सूत्रांची माहिती आहे. दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए, असं म्हणत भोंदू अशोक खरातने एसआयटीच्या चौकशीत केलेल्या काळ्या कारनाम्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे. महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी वापरलेल्या ट्रिक्सला विज्ञानानाचे नाव दिल्याचे समोर आले आहे. या काळया कारनाम्यात खरातला अन्य कुणाची मदत होती का? याचा तपास सुरू आहे. Ashok Kharat Case Ashok Kharat Case अशोक खरातला नाशिक न्यायालयाने 8 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. एसआयटीकडून त्याची कसून चौकशी केली जात आहे. तसेच या प्रकरणाची व्याप्ती पाहता अनेक गोष्टींचा उलघडा करण्याकरीता ईडीकडून देखील चौकशी केली जाणार असल्याची माहिती आहे. अशोक खरात याच्यावर महिलांचे लैंगिक शोषणासह आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. बँक व्यवहारांसह मोठ्या प्रमाणातील मालमत्ता आणि युएईपर्यंत पोहोचलेल्या हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे याची चौकशी ईडीकडून केली जाणार आहे. एसआयटीने केलेल्या तपासात 130 हून अधिक बँक खात्यांमधील व्यवहारांची छाननी केली जात असून, त्यात ‘समता नागरी पतसंस्था’सह विविध सहकारी संस्थांचा समावेश आहे. सुमारे 63 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम या खात्यांमधून फिरवल्याचा संशय आहे. अनेक खात्यांमध्ये खरात यांचे नाव ‘नॉमिनी’ म्हणून असून, ती खाती त्याच्या मोबाईल नंबरवर चालवली जात होती, असा प्राथमिक अंदाज आहे. ईडीचे लक्ष Ashok Kharat Case या प्रकरणाचे पुणे कनेक्शन समोर आले होते. पुण्यातही अशोक खरातने मोठी माया जमा केली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 100 कोटींची मालमत्ता असून, मालमत्ता त्यांच्या चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश पोफळे यांच्या नावावर असल्याचे सांगितले जाते. त्यावर ईडीचे लक्ष आहे. तसेच नाशिक, सिन्नर आणि शिर्डी येथे 52 हून अधिक जमिनींची चौकशी ईडी करणार असल्याची सूत्रांची माहिती समोर आली आहे. तेजस्वी सातपुते आज पत्रकार परिषद घेणार Ashok Kharat Case या प्रकरणात अशोक खरातची चौकशी सुरू असल्याचे समोर आले. त्याच्याकडून गुन्ह्यासंदर्भात माहिती घेत त्याद्वारे चौकशी आणि तपासाचे चक्र फिरवली जात आहेत. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपविण्यात आला आणि या पथकाच्या प्रमुख पदी म्हणून पोलीस अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नियुक्ती करण्यात आली. आज त्या प्रथमच माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मिळत आहे. ही पत्रकार परिषद सायंकाळी होणार असल्याची माहिती आहे. या पत्रकार परिषदेत तेजस्वी सातपुते कोणती माहिती देणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. हेही वाचा : PCMC News : आयुक्तांचे आदेश धाब्यावर! स्मार्ट सिटीचे हस्तांतरण रखडले; नेत्यांना ‘संचालक’ पदाचा मोह?