Eknath Shinde : नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यातील निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील बारामती आणि राहुरी या जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली. यानंतर हालचालींना वेग आला आहे. या दोन ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध करणे हा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असणार आहे. अशातच एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी १७ मार्च रोजी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. एकीकडे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे. हेही वाचा : Shankar Patil Suicide : सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील यांची आत्महत्या! चिठ्ठीतील ‘तो’ मजकूर वाचून डोळे पाणावतील या दौऱ्यात जागावाटप आणि मित्रपक्षांमधील समन्वय तसेच मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करणे, हे या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे बोलले जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मागील तीन निवडणुकांमध्ये मित्रपक्षांकडून शिवसेनेला न मिळालेले सहकार्य तसेच अनेक मतदारसंघांमध्ये मित्रपक्षांच्या असहकार्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला असल्याचा ठपका ठेवणारी बाब पक्षाचा अंतर्गत पाहणी अहवालात समोर आली आहे. हे रिपोर्ट कार्ड उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मांडण्याची शक्यता आहे. खासदारांची बैठक Eknath Shinde Eknath Shinde News Marathi संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या खासदारांची एक महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत पार पडली. या बैठकीत अधिवेशनातील विविध कामकाज आणि पक्षाच्या भूमिकेवर सविस्तर चर्चा झाली. “अर्थसंकल्पीय अधिवेशन हे देशाच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या धोरणांना पाठिंबा देताना शिवसेनेची भूमिका जनतेच्या हिताचीच राहील,” असे एकनाथ शिंदेंना खासदारांना सांगितले. शिवसेनेची आक्रमक भूमिका Eknath Shinde विरोधी पक्षाकडून विविध मुद्दे उपस्थित केले जात आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात फेक नॅरेटिव्ह पसरला जात असून, विरोधकांच्या खोट्या प्रचाराचा प्रदार्फाश करण्यासाठी शिवसेना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे बैठकीतून स्पष्ट झाले आहे. हेही वाचा : Chain Snatching : चोरट्याचा डाव फसला! पतीच्या एका धाडसी कृतीने साखळी चोरटा थेट पोलिसांच्या जाळ्यात