Bank Employees Strike | ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’ने 27 जानेवारी 2026 रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत बँकेकडून पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची मुख्य मागणी करण्यात आली आहे. हा संप यशस्वी झाल्यास सलग तीन दिवस बँकांचे कामकाज ठप्प राहण्याची शक्यता आहे. कारण जानेवारी महिन्यात 25 तारखेला रविवार आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुट्टी आहे. त्यानंतर लगेच 27 तारखेला संपाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्यक्षात तीन दिवस बँकेचे कामकाज बंद राहू शकते. यामुळे चेक क्लिअरन्स, रोख व्यवहार आणि इतर वित्तीय कामांवर मोठा परिणाम होऊन व्यवहार पूर्णपणे ठप्प होण्याची भीती आहे. यामुळे नागरिकांना नाहक त्रास होऊ शकतो. Bank Employees Strike | काय आहे नेमकी मागणी ? प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असते. तर कर्मचारी संघटना उर्वरित दोन शनिवारीदेखील सुटी मिळावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत. म्हणजेच बँक कर्मचाऱ्यांना आठवड्याचे पाच दिवस काम आणि प्रत्येक शनिवार रविवार सुट्टी हवी आहे. मार्च 2024 मध्ये झालेल्या वेतन करारात ‘आयबीए’ आणि ‘यूएफबीयू’ यांच्यात या मागणीवर सहमती झाली होती. मात्र, सरकारकडून अद्याप याबाबत अंतिम निर्णय घेण्यात आलेला नसल्याने बँक कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतला आहे. Bank Employees Strike | हेही वाचा: पुणेकरांसाठी खुशखबर! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोच्या ‘त्या’ चाचणीचा अडथळा दूर; लवकरच धावणार मेट्रो