बांगलादेशसोबतच नेदरलँड्सच्या महिला संघानेही या स्पर्धेसाठी पात्रता (Qualify) सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे, नेदरलँड्सचा महिला संघ पहिल्यांदाच टी-२० वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसणार आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे डच क्रिकेटमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
\nपुरुषांच्या वर्ल्ड कपमधून बाहेर का झाले?
\nबांगलादेश महिला टी२० विश्वचषक २०२६ साठी पात्र
२०२६ च्या सुरुवातीला केकेआरने (KKR) मुस्तफिझूर रहमानला बीसीसीआयच्या सूचनेवरून संघातून मुक्त केले होते. या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड प्रचंड संतापले आणि त्यांनी ७ फेब्रुवारीपासून भारतात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपसाठी आपला संघ पाठवण्यास नकार दिला. आयसीसीने समजावूनही बांगलादेश आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने अखेर त्यांच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे.
\n\nमहिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ चे स्वरूप –
\n