Ashwini Jagtap Vs Shankar Jagtap | भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कुटुंबातील वाद ऐन महापालिका निवडनुकीदरम्यान समोर आल्याने पिंपरी-चिंचवडमधील राजकारणात चर्चेचा विषय ठरला. लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप आणि बंधू शंकर जगताप या दीर-वाहिनींमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे पाहायला मिळाले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतदानापूर्वी अश्विनी जगताप यांनी ‘निष्ठा की विश्वासघात?’ अशी हेडिंग देत व्हॉट्सॲप स्टेटस ठेवला. आमदार शंकर जगताप यांनी ‘नमकहरामी’ व्यक्तीला उमेदवारी दिल्याचा आरोप करत वहिणींनी सोशल मीडियावरून टीका केली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. “तू १५ वर्षे भाऊ बरोबर नव्हता, तर त्यांच्या ‘शेवटाची’ वाट पाहत होतात. ज्या भाऊंनी तुला ओळख दिली, त्यांच्याच विरुद्ध इतकी वर्षे मनात विष पेरून ठेवले?”, असे गंभीर विधान अश्विनी जगताप यांनी केले आहे. दरम्यान, आमदार शंकर जगताप यांनी माऊली जगताप यांना प्रभाग ३१ मधून उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीवरून दीर-वहिनीत वाद उभा राहिला आहे. त्यानंतर माऊली जगताप यांनी उमेदवारी मिळाल्यानंतर गुलालात माखलेला एक फोटो पोस्ट करत “पंधरा वर्षांपूर्वी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरले”, असे म्हटले होतं. त्यावर अश्विनी जगतापांनी पोस्ट शेअर करत पलटवार केला. Ashwini Jagtap Vs Shankar Jagtap | अश्विनी जगतापांनी काय म्हटले आहे? माजी आमदार अश्विनी जगताप यांनी माऊली जगताप यांचा हा फोटो स्टेट्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, ‘निष्ठा की विश्वासघात? ‘१५ वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न आज पूर्ण’ असं म्हणणाऱ्या ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप हे स्वप्न पाहताना तुला तुझीच लाज कशी वाटली नाही? जेव्हा स्वर्गीय लोकनेते लक्ष्मण भाऊ जगताप आपल्या कर्तृत्वाने राजकारण गाजवत होते, तेव्हा तू त्यांच्याच सावलीत बसून त्यांच्या जागी दुसऱ्याला पाहण्याचे मनसुबे रचत होतास?” Ashwini Jagtap Vs Shankar Jagtap | “याचा अर्थ असा की, तू १५ वर्षे भाऊ बरोबर नव्हता, तर त्यांच्या ‘शेवटाची’ वाट पाहत होतात. ज्या भाऊंनी तुला ओळक दिली. त्यांच्याच विरुद्ध इतकी वर्षे मनात विष पेरून ठेवले? हे स्वप्न नाही, तर ही नमकहरामी आहे ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप”, विजयाचा गुलाल उधळताना भान विसरलास, पण लक्षात ठेव ते तुझे स्वप्न नाही, तर तुझ्या सडक्या वृत्तीचे आणि बुद्धीचे प्रदर्शन आहे”, असा संताप माजी आमदार अश्विनी जगताप यांनी दीर शंकर जगताप यांनी दिलेल्या उमेदवाराबद्दलच व्यक्त केला आहे. दिराचा वहिणींवर पलटवार मात्र शंकर जगताप यांनी देखील काहीही करून आपल्या निष्ठावंत माऊली जगताप यांना निवडून आण्याच्या हेतूने मतदान संपेपर्यंत प्रभाग क्रमांक ३१ मध्ये ठाण मांडून होते. मात्र सायंकाळी ५.३० वाजता मतदान प्रक्रिया संपताच दिराने वहिणींवर पलटवार केला. शंकर जगताप यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमधून थेट अश्विनी जगताप यांचा फोटो हटवला. कालपर्यंत दिराच्या पोस्टवर दिसणाऱ्या अश्विनी जगताप आज अचानक गायब झाल्याने वादाला आणखी फोडणी मिळाली. खरं तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर दिर–वहिणींमधील वाद शमल्याचं चित्र होतं. मात्र प्रभाग 31 चे उमेदवार माऊली जगताप यांच्या एका पोस्टने हा गृहकलह पुन्हा चव्हाट्यावर आला. शंकर जगताप यांनी माऊली जगताप यांच्या रूपाने प्रभाग 31 मध्ये अतिक्रमण केल्याची चर्चा आहे. मात्र तेथील भाजपमधील इच्छुकांना उमेदवारी मिळावी म्हणून अश्विनी जगताप यांनी शिफारस केली होती. प्रत्यक्षात शंकर जगताप यांनी या सर्वांचा पत्ता कट केला. यावरून वहिणींना राजकारणातून हद्दपार करण्याची ही खेळी दिराने खेळल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू झाली आहे. Ashwini Jagtap Vs Shankar Jagtap | हेही वाचा : “कदाचित महापौर कुणाचा बसवायचा…”; मतमोजणीच्या दिवशी रोहित पवारांचे सूचक ट्वीट, नेमकं काय म्हणाले?