Chhagan Bhujbal : बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराची सांगता सभा भावनिक वातावरणात पार पडणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ भाषण करत असताना मंचावर सुप्रिया सुळे यांची एंट्री झाली आणि उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले. यावेळी दिवंगत अजित पवार यांच्या नावाने घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. (Chhagan Bhujbal) या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी ही सांगता सभा आयोजित करण्यात आली आहे. (Chhagan Bhujbal) घराचा आधार हरवला (Chhagan Bhujbal) भाषणात भुजबळ म्हणाले, “घराचा आधार हरवला असला तरी घर अजूनही ठाम उभं आहे. दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकजुटीने काम करायचं आहे.” त्यांनी मतदारांना सुनेत्रा पवार यांना विजयी करण्याचं आवाहन करत प्रत्येक मत महत्त्वाचं असल्याचं अधोरेखित केलं. (Chhagan Bhujbal ) Chagan Bhujabal : एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला राष्ट्रवादीतून विरोध झालेला का? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं म्हणाले…. सुनेत्राताईही देशपातळीवर नेतृत्व करतील पुढे बोलताना त्यांनी सुनेत्रा पवार यांना भविष्यातील मोठ्या महिला नेत्या म्हणून संबोधलं. “देशात अनेक महिला सर्वोच्च पदांवर पोहोचल्या आहेत. त्याचप्रमाणे सुनेत्राताईही राज्य आणि देशपातळीवर नेतृत्व करतील,” असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. (Supriya Sule) दरम्यान, सुप्रिया सुळे मंचावर येताच भावनिक वातावरण निर्माण झाले. विविध पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा दर्शवल्याचा उल्लेख करत भुजबळांनी “अश्रू पुसून आता निर्धाराने ताईंना विजयी करायचं आहे,” असे आवाहन केले. (Chhagan Bhujbal) काय म्हणाल्या सुप्रिया सुळे आपल्या भाषणात बोलताना सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्यामागे महाविकास आघाडी खंभीरपणे उभी राहील, असे आश्वासन दिले. त्यानंतर काही वेळातच त्या सभेतून निघाल्या. यावेळी प्रफुल पटेल यांचे भाषण सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सभास्थळी येण्याआधीच सुळे तिथून गेल्या. यावेळी व्यासपीठावर उद्योगमंत्री उदय सामंतही उपस्थित होते. हेही वाचा : Supriya Sule : प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करणार? राहुरीत मोठी राजकीय घडामोडीची शक्यता; सुप्रिया सुळे म्हणाल्या “शक्य असेल. पण…”