Rajpal Yadav : चेक बाऊन्स प्रकरणामुळे अडचणीत आलेला आणि त्यानंतर तुरुंगात जावं लागलेल्या बॅालीवूड अभिनेता राजपाल यादवची अखेर १३ दिवसांनी तुरुंगातून सुटका झाली आहे. त्यानंतर त्याने माध्यमांशी संवाद साधत आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “ही घटना २०१२-१३ मध्ये घडली आणि तेव्हापासून मी अनेक चित्रपट केले आहेत. भारतीय चित्रपटसृष्टीतील तरुण आणि वृद्ध माझ्यासोबत होते आणि माझ्यासोबत आहेत. देशभरातील सगळेच लोक माझ्यासोबत आहेत. ज्या प्रकारे संपूर्ण देश आणि जग, माझं बॉलिवूड, माझ्यावर प्रेम करतं, जर माझ्यावर काही आरोप असतील तर मी त्यांना उत्तर देण्यास तयार आहे.” अशी पहिली प्रतिक्रिया राजपाल यादवने दिली आहे. Rajpal Yadav या प्रतिक्रियेतून राजपालने चाहत्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. पुढे बोलताना राजपाल यादव म्हणाला, मला आता बॉलिवूडमध्ये ३० वर्षे पूर्ण होतील. देशातील आणि जगातील प्रत्येक मूल माझ्या पाठीशी उभं राहिललं, म्हणूनच मी २५० चित्रपट करू शकलो. संपूर्ण बॉलिवूड माझ्यासोबत आहे, असे राजपाल यादवने सांगितले. ही प्रतिक्रिया देताना राजपाल काहीसा भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. जर तुम्हाला काही कायदेशीर माहिती हवी असेल तर तुम्ही माझे वकील भास्कर उपाध्याय यांना विचारू शकता, असेही राजपाल यादवने सांगितले. न्यायालयाने राजपाल यादवला जामीन मंजूर केला असून चेक बाऊन्स प्रकरणाची पुढील सुनावणी १८ मार्च २०२६ पार पडणार आहे. न्यायालयाने दिलेल्या जामीनावर राजपाल म्हणाला, मी न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाचा आदर करतो आणि त्याचे पालन करतो आणि वर्षानुवर्षे करत आहे. नेमकं प्रकरण काय आहे? अभिनेता राजपाल यादवशी निगडित असलेले चेक बाऊन्स प्रकरण २०१० सालचे आहे. या वर्षात राजपाल यादवने ‘अता पता लापता’ हा चित्रपट केला होता. हा चित्रपट तयार करण्यासाठी मुरली प्रोजेक्ट या कंपनीकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. हा चित्रपट बॅाक्स अॅाफिसवर फ्लॅाप ठरला. चित्रपटाचे बजेट ११ कोटी होते. चित्रपटाने केवळ फक्त ४७ लाख रुपयांची कमाई केली. त्यामुळे घेतलेल्या कर्जावर व्याज वाढत गेले आणि ही रक्कम तब्बल ९ कोटी रुपये इतकी झाली. राजपाल यादवने परतफेडीसाठी चेक दिले, दिलेले चेक बाऊन्स झाले. त्यानंतर त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. हेही वाचा : youtube closed: जगभरातील व्हिडिओ प्लॅटफॉर्म you tube अचानक बंद ; लाखो युझर्सला फटका, नेमकं कारण काय ?