Rohit Pawar press conference : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुसरी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी मोठे गौप्यस्फोट केले आहेत. सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांनी अजित पवार यांच्या विमानाचा जाणुनबुजून अपघात करण्यात आल्याचा खळबळजनक दावा केला आहे. तसेच त्यांनी पुन्हा एकदा प्रेझेंटेशनसह विमान अपघातातबाबत आपले मुद्दे सविस्तर मांडले. पत्रकार परिषदेत रोहित पवारांनी विमानात अधिक इंधन असल्यानेच मोठा स्फोट झाल्याची आमची शंका खरी ठरत असल्याचे विधान केले आहे. टॉयलेटच्या मागे असणाऱ्या जागेत अधिक इंधन ठेवण्यात आलं होतं. तिथेच हा ब्लॅक बॉक्स असतो. आधी हे कॅन आणि नंतर पंख्यातील इंधन जळालं असा दावा रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत केला. ajit pawar नेमकं काय म्हणाले रोहित पवार? “मुंबईवरुन हे विमान जात असताना इंधन भरलं होतं. हैदराबादला इंधन भरु शकला असता. महाराष्ट्रात इंधन स्वस्त मिळतं असा युक्तिवाद असेल तर सूरतमध्येही इंधन स्वस्त आहे. टाकीत आणि आतपण इंधन घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय होतं? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मुद्दामूनच त्याचा वापर करुन हा घातपात झाला असावा, असा मोठा दावा रोहित पवारांनी केला आहे. हा घातपात असून इंधन जास्त असल्याने स्फोट होईल ही शंका खरी ठरताना दिसत आहे. त्यांनी अधिकृतपणे डीजीसीएला सांगितलं नव्हतं. एकतर उड्डाण करायला नको होतं. विमान मुद्दामून आदळण्यात आलं अशी आम्हाला शंका आहे, असा खळबळजक दावाही रोहित पवारांनी केला आहे. विमान अपघाताचा डेटा रिकव्हर करण्यासाठी विमानाची बांधणी ज्या ठिकाणी झाली तेथील प्रतिनिधींची मदत घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ब्लॅक बॅाक्सबाबत रोहित पवारांनी महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले, ब्लॅक बॉक्स 1100 डिग्री सेल्सिअसला तरच फटका बसू शकतो. त्यात वॉइस रेकॉर्डिंग, आणि एफडीआर असतो. ते 6 हजार मीटर खोलीपर्यंत 1 महिना पाण्यात टिकू शकतं. पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, आपल्याला तिथे बरेचसे कागद न जळालेले दिसले. कारण आगीचा भपका काही वेळासाठी असतो. विमानीची बॉडी 635 डिग्रीला वितळते. ब्लॅक बॉक्सजवळची बॉडी जळालेली नाही. त्यामुळे छेडछाड झाली असं आमचं ठाम मत आहे, असा गंभीर आरोप रोहित पवारांनी केला आहे. रोहित पवारांनी पुन्हा एकदा विमान अपघाताला घेऊन पत्रकार परिषदेतून केलेल्या दाव्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. पुन्हा एकदा अजित पवार यांचा विमान अपघात घातपात आहे का या चर्चा देखील झडू लागल्या आहेत. हेही वाचा : Muslim Reservation : ‘सबका साथ, सबका विकास’ म्हणायचं आणि दुसरीकडे आरक्षणासाठी…; मुस्लिम आरक्षण रद्द होताच काँग्रेसची सरकारवर टीका