Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातात निधन झाले असून आज त्यांच्यावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतिमामात अत्यंसंस्कार होणार आहेत. आज सकाळी ११ वाजता अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडाले आहे. अजित दादांच्या अकाली एक्सिट सर्वांनाच धक्का देणारी आहे. अजित पवार (Ajit Pawar ) यांची राजकीय कारकीर्द झंझावाती ठरली. त्यांनी सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री पद भूषविले. राज्याचा अर्थसंकल्प देखील अजितदादांनी विधिमंडळात अनेकदा सादर केला. यासोबतच अजित पवार यांच्या राजकीय सभांचेही रेकॅार्ड आहे. त्यांनी अनेक सभा, प्रचार दौरे केले. झंझावाती कारकीर्दीत त्यांनी अनेक सभा गाजवल्या. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडलेल्या सभेपासून झाली. त्यांनी या मैदानावर अनेक सभा घेतल्या. दरम्यान, अजित पवार यांचे पार्थिव काल रात्री त्यांच्या सहयोग निवासस्थानी होते. जिथून ते पहाटेच त्यांच्या काटेवाडी या मूळ गावी नेण्यात आले. ही बातमी वाचा :Ajit Pawar : आता अर्थसंकल्प कोण मांडणार? ‘या’ नेत्याकडे धुरा जाण्याची शक्यता अंत्यसंस्काराचा कार्यक्रम कसा असेल? सकाळी ६ ते ९: काटेवाडी येथील निवासस्थानी पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी ९ वाजता: काटेवाडीहून हे पार्थिव रुग्णवाहिकेने ग. दि. मा. सभागृह येथे आणले जाईल. सकाळी १० वाजता: ग. दि. मा. सभागृह ते विद्या प्रतिष्ठान दरम्यान अंत्ययात्रा काढण्यात येईल. सकाळी ११ वाजता: विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील. Ajit Pawar ‘हे’ व्हीव्हीआयपी राहणार उपस्थित : या अंत्यविधीसाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह केंद्र आणि राज्यातील अनेक मोठे नेते बारामतीत दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर व्हीआयपींच्या सुरक्षेसाठी बारामती विमानतळावर पोलिसांसह NDRF चे पथक तैनात करण्यात आले आहे. सुमारे २ ते ३ लाख लोक या सोहळ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. यामुळे पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळत आहे. सध्या पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली असून वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत.