Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवारांच्या निधनाने आपल्याला मोठा धक्का बसला असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत . आपल्या भवन व्यक्त करताना “ते विमान तिथे कसे पोहोचले किंवा उतरले, हे मला माहीत नाही. कारण, जिथे विमाने उतरतात आणि उड्डाण करतात, ती धावपट्टी खूप मोठी आहे, लहान नाही. असे असूनही, हे कसे घडले? विमानात काही बिघाड होता, की वैमानिकाने चूक केली? मी काही सांगू शकत नाही, कारण मला ही बातमी पचवणं खूप कठीण आहे ” असे भुजबळ यांनी म्हटले. दरम्यान, पवार यांच्यावर आज ११ वाजता पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विविध राजकीय पक्षांचे ज्येष्ठ नेते श्रद्धांजली वाहण्यासाठी बारामती येथे पोहोचले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्व असलेले अजित पवार यांचे मुंबईहून बारामतीला जात असताना एका चार्टर्ड विमानाचा अपघात होऊन निधन झाले. ajit pawar पवार जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीला जात होते. पवार यांनी अनेक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आणि राज्य सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळली. पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः बारामतीमध्ये, त्यांच्या प्रभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या पवार यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात तीन दिवसांचा दुखवटा पाळण्याचे आदेश दिले. हे देखील वाचा… Ajit Pawar: ‘अजितदादा अमर रहे’! लाडक्या दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला; महिलांनी टाहो फोडला