Ajit Pawar : अजित दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड गर्दी…; बारामतीत शोकमय वातावरण VIDEO
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. दरम्यान ,अजित पवार यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बारामतीत सध्या शोकाकुल वातावरण आहे. अजित पवारांची अंतिमयात्रा विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानात दाखल झाली असून परिसरात मोठी गर्दी जमली.
अजित पवार यांनी अनेक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम केले आणि राज्य सरकारमध्ये महत्त्वाची खाती सांभाळली. पश्चिम महाराष्ट्रात, विशेषतः बारामतीमध्ये, त्यांच्या प्रभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या पवार यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.
भीषण अपघाताने लोकनेता हिरावला
काल सकाळी पाऊणे नऊच्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला. विमान थेट जवळच्या शेतात जाऊन आदळले आणि एकामागून एक स्फोट झाले. यामध्ये लोकप्रिय नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासह इतर पाच जणांना काळाने हिरावले. या वृत्ताने राज्याला मोठा धक्का बसला. राज्यातील अनेकांनी थेट बारामती आणि काटेवाडीकडे धाव घेतली. आता अजितदादांना अखेरचा निरोप देण्यात येत आहे.





