Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातात निधन झाले असून आज त्यांच्यावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठान मैदानावर शासकीय इतिमामात अत्यंसंस्कार होणार आहेत. आज सकाळी ११ वाजता अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला जाणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शोकसागरात बुडाले आहे. अजित दादांच्या अकाली एक्सिट सर्वांनाच धक्का देणारी आहे. अजित पवार यांची राजकीय कारकीर्द झंझावाती ठरली. त्यांनी सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री पद भूषविले. राज्याचा अर्थसंकल्प देखील अजितदादांनी विधिमंडळात अनेकदा सादर केला. यासोबतच अजित पवार यांच्या राजकीय सभांचेही रेकॅार्ड आहे. त्यांनी अनेक सभा, प्रचार दौरे केले. झंझावाती कारकीर्दीत त्यांनी अनेक सभा गाजवल्या. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर पार पडलेल्या सभेपासून झाली. त्यांनी या मैदानावर अनेक सभा घेतल्या. कलाविश्वातून देखील दादांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. हे देखील वाचा : Ajit Pawar: “आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही असं वाटतंय…” अजित पवारांच्या निधनानंतर संकर्षण कऱ्हाडे भावूक अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रानौत यांनी अजित पवार यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. संसदेत पत्रकारांनी त्यांना वेढले होते. अजित पवारांच्या मृत्यूबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा त्या खूप हैराण दिसत होत्या. पुढे त्या म्हणाल्या, ” हे खूप भयानक आहे. Ajit Pawar ही भयानक बातमी आहे. मला माफ करा,याबद्दल मला काहीही बोलायचे नाही.”. एकंदरच त्या बोलण्याच्या मनस्थितीत नव्हत्या असं दिसतं होतं. नंतर त्यांनी सोशल मीडियावरून पोस्ट करत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. अजय देवगणची पोस्ट अभिनेता अजय देवगण यानेही त्याच्या पोस्टमधून दु:ख व्यक्त केलं. “माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार जी यांच्या दुःखद निधनाने धक्का बसला आणि दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि या मोठ्या नुकसानाने प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझी मनापासून संवेदना.” असं त्याने पोस्टमध्ये नमूद केलं. हे देखील वाचा : Ajit Pawar : आता अर्थसंकल्प कोण मांडणार? ‘या’ नेत्याकडे धुरा जाण्याची शक्यता