Air India Flight। मुंबईला जाणारे एअर इंडियाचे विमान AI-887 (बोईंग 777-300ER) तांत्रिक बिघाडामुळे दिल्लीला परतावे लागले. विमानाचे आज सकाळी 7:47 वाजता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. आज सकाळी दिल्लीहून मुंबईला उड्डाण घेतल्यानंतर, विमानाच्या इंजिन क्रमांक 2 मधील तेलाचा दाब शून्यावर आला, ज्यामुळे पायलटने आपत्कालीन लँडिंगसाठी दिल्लीतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. आपत्कालीन कॉल मिळाल्यानंतर, विमानतळ कर्मचाऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी सुरू केली. हवेत काही वेळ थांबल्यानंतर, विमान विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. अचानक दिल्लीला परतल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली होती. विमानात 337 लोक होते Air India Flight। लँडिंगनंतर, सर्व प्रवासी आणि क्रू सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. जखमी किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. एअर इंडियाचे विमान AI-887 मध्ये 337 कर्मचारी आणि प्रवासी होते. विमानाचे आपत्कालीन लँडिंग Air India Flight। अग्निशमन नियंत्रण कक्षाच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे घटनेची पुष्टी केली, ते म्हणाले की, “विमानात एकूण ३३७ प्रवासी आणि कर्मचारी होते. खबरदारी म्हणून, विमान दिल्लीला परत करण्याचा निर्णय घेण्यात आला. लँडिंगनंतर, सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.” विमानाची सध्या तांत्रिक तपासणी सुरू आहे. तथापि, एअर इंडियाने आपत्कालीन लँडिंगबाबत अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.