AI Prediction : आयपीएल 2026 स्पर्धेला काही महिन्यात सुरुवात होणार आहे. त्या अगोदर मिनी ऑक्शन होणार आहे. त्यामुळे ऑक्शनआधी एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे या ऑक्शनमध्ये कोणत्या खेळाडूवर मोठी बोली लागणार. बीसीसीआयच्या नियमानुसार या ऑक्शनमध्ये (AI Prediction) कुठल्याही परदेशी खेळाडूवर १८ कोटींहून अधिकची बोली लागू शकत नाही. यादरम्यान या ऑक्शनमध्ये कोणत्या खेळाडूवर विक्रमी बोली लागणार? याबाबत AI ने भविष्यवाणी वर्तवली आहे. कोणत्या खेळाडूवर लागणार विक्रमी बोली? आगामी ऑक्शनमध्ये ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीनवर विक्रमी बोली लागू शकते, अशी भविष्यवाणी AI ने वर्तवली आहे. त्याच्यावर २० कोटींहून अधिकची बोली लागू शकते.कॅमरून ग्रीनसारखा अष्टपैलू खेळाडू प्रत्येक संघाला आपल्या संघात हवाहवासा वाटतो. कारण ग्रीन हा टॉप ऑर्डरमध्ये फलंदाजीला येऊन वेगाने धावा करू शकतो. तसेच मधल्या फळीत देखील धावा करू शकतो. यासह वेगवान गोलंदाजी करून गोलंदाजीत देखील मोलाची भूमिका बजावतो. त्यामुळे अशा अष्टपैलू खेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी सर्वच संघ प्रयत्न करताना दिसतील. कॅमरून ग्रीनसाठी कोणत्या संघात रंगणार चुरस? यावेळी कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ कॅमरून ग्रीनला आपल्या संघात घेण्यासाठी जोर लावू शकतात. कारण दोन्ही संघांकडे पर्सची रक्कम जास्त आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाकडे ६४.३ कोटी. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाकडे ४३.४ कोटी रुपये शिल्लक आहेत. या हंगामापूर्वी कोलकाता नाईट रायडर्स संघातील प्रमुख अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे हा संघ रसेलची पोकळी भरून काढण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे सॅम करन चेन्नई सुपर किंग्ज संघातून बाहेर पडला आहे. त्यामुळे ती जागा भरून काढण्यासाठी चेन्नईचा संघ कॅमरून ग्रीनला आपल्या संघात घेऊ शकतो. त्यामुळे AI ने वर्तवलेली भविष्यवाणी खरी ठरते का? हे काही दिवसांत स्पष्ट होईल.