Sujat Ambedkar | काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे महापालिका निवडणुकांनंतर भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केला आहे. प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये डील झाल्याचेही सुजात आंबेडकर म्हणाले. त्याच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारासाठी सुजात आंबेडकर सोलापुरात आले होते. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्यावर हल्ला चढवला. नेमकं काय म्हणाले सुजात आंबेडकर? “आपल्या विरोधात भाजप आहे आणि दुसऱ्या बाजूलाही भाजपच आहे, कारण प्रणिती शिंदे ह्या भाजपसाठी काम करतात हे सर्वांना माहित आहे. या निवडणूकीच्या आधी प्रणिती शिंदे भाजपमध्ये प्रवेश करणार होत्या, ऑक्टोबर महिन्यातच त्या प्रवेश करणार होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितलं की, थांबा तीन महत्वाच्या नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत. Sujat Ambedkar | तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा आणि सेटिंग करून भाजपचे सर्व उमेदवार निवडून आणा. त्यानंतर प्रणिती ताई काँग्रेस मधून भाजपमध्ये प्रवेश करतील अशी प्रणितीताई आणि देवेंद्र फडणवीस यांची डील झालेली आहे”, असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला. Sujat Ambedkar | ‘सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार हे भाजपसाठी काम करतात’ “तुम्हाला भाजपला पाडायचा असेल तर वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय तुमच्या समोर आहे. यांची भाजपसोबतची नाती खूप लांबपर्यंत आहेत. 2 ते 3 महिन्यांपूर्वी सुशील कुमार शिंदे यांची नात दिया श्रॉफच्या लग्नात शरद पवार,गौतम अदानी आणि देवेंद्र फडणवीस हे तीन चीफ गेस्ट होते. हे भाजप आणि काँग्रेस एकमेकांवर रस्त्यावर लढायचे नाटक करतात. मात्र यांचे बिजनेस एक, यांची लग्न एक, यांचे नातेगोते एक, यांचे सर्व धंदे एक आणि प्रणिती ताईने प्रवेश घेतला की यांचा पक्ष सुद्धा एक म्हणून काँग्रेसच्या नादाला लागू नका, तुम्ही काँग्रेसला मत दिले म्हणजेच भाजपाला मत दिल्यासारखे होते. सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार हे भाजपसाठी काम करतात हे अख्या जगाला कळून चुकलं आहे,” असे सुजात आंबेडकर म्हणाले. Sujat Ambedkar | हेही वाचा: निवडणुकीच्या प्रचाराचा ‘सुपर संडे’पासून ते प्रणिती शिंदेच्या भाजप प्रवेशापर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर