Prithviraj Chavan | महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देशाच्या राजकारणात १९ डिसेंबरला मोठा भूकंप होणार असल्याचे भाकीत केले आहे. भारताचा पंतप्रधान बदलेल आणि मराठी माणूस पंतप्रधान होईल, पण तो काँग्रेसचा नाही तर भाजपचा असेल, असा दावा मोठा त्यांनी केला आहे. अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्या व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये अनेक राजकीय पुढाऱ्यांचे फोटो आणि व्हिडिओ देखील आहेत. त्यातील काही नावे सध्या सोशल मीडियावर देखील समोर आली आहेत. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या 19 डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे असा दावा चव्हाणांनी केला आहे. यात कोणाची नावं आहेत? याची मला फारशी कल्पना नाही, असं म्हणत चव्हाणांनी अमेरिकेतील स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे. काँग्रेसचा पंतप्रधान होणार नाही, कारण… तसेच बदल घडला तर काँग्रेसचा पंतप्रधान होणार नाही. कारण आमच्याकडे काही बहुमत नसल्याचे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवडमध्ये जनगणमन या पुस्तकाच्या प्रकाशन केल्यानंतर चव्हाणांनी भारतात 19 डिसेंबरला राजकीय भूकंप होण्याचं भाकीत केलं. Prithviraj Chavan | याआधी देखील माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी महिनाभरात मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होण्याची शक्यता असल्याचं विधान करत महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा एका कार्यक्रमात याबाबत विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी राजीनामा देणार का, अशा चर्चांना उधाण आलं आहे. हेही वाचा: एकुलता एक आधार गेला, पण कायद्याचा दिलासा; पीएमपी बस अपघातातील मृताच्या पालकांना २० लाखांची मदत