ZP Election | राज्यातील महापालिका निवडणूकांची रणधुमाळी सध्या सुरू असून प्रचारसभांनी वेग धरला आहे. येत्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे. या निवडणुकांनतर राज्यातील ज्या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे, त्या सोडून 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुका होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडणार असल्याची शक्यता आहे. कारण आता निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदेच्या निवडणूकीसाठी मुदतवाढ देण्याकरिता कोर्टात अर्ज केला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद निवडणूक 31 जानेवारीपर्यंत घेण्याची आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यामुळे आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा या आठवड्यात होण्याची शक्यता होती. मात्र, निवडणूक आयोगाने पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेत जिल्हा परिषदेच्या निवडणूक घेण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी निवडणूक आयोगाने कोर्टाकडे केली आहे. ’10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्या’ सगळ्याच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 10 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ द्यावी, यासाठी निवडणूक आयोगाने कोर्टात अर्ज केला आहे त्या संदर्भात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर आजच सुनावणी होणार आहे. ZP Election | दरम्यान, निवडणूक आयोगाने पश्चिम महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याची तयारी पूर्ण केली होती. या निवडणुकीचा कार्यक्रम देखील जाहीर करण्याच्या तयारीत राज्य निवडणूक आयोग होते. मात्र आता आजच्या सुनावणीत कोर्ट निवडणुकीबाबत काय भूमिका घेणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ZP Election | हेही वाचा: Golden Globe 2026: रेड कार्पेटवर प्रियंका चोप्राचा जलवा, निक जोनससोबतची केमिस्ट्री ठरली चर्चेचा विषय