Bhagur Nagar Parishad Election Result 2025 | नाशिकमधील भगूर नगरपरिषद निवडणुकीत मोठा सत्ताबदल झाल्याचे दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेची तब्बल 25 वर्षांची सत्ता उलथवून टाकली आहे. मतमोजणीला सुरुवात होताच अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने दमदार कामगिरी करत विजयाचे खाते उघडले आणि एकूण सात उमेदवारांनी विजय मिळवला आहे. हा निकाल अजित पवारांचा मोठा कमबॅक मानले जात आहे. भगूर नगरपरिषदेच्या जागेसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान झाले. त्यानंतर 21 डिसेंबर रोजी मतमोजणीला सुरुवात होताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली. पहिल्या काही फेऱ्यांमध्येच राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेत विजय निश्चित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे यांनी विजय मिळवला असून, त्यांना भाजपचा पाठिंबा आहे. भगूरच्या राजकारणात मोठा बदल निकालानुसार भगूर नगरपरिषदेत एकूण १७ जागांवर अजित पवार गट आणि भाजप, तर ३ जागांवर शिवसेना (शिंदे गट) विजयी झाल्याची माहिती मिळत आहे. या निकालामुळे भगूरच्या राजकारणात मोठा बदल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याधी २०१७ च्या भगूर जागेसाठी झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालात, शिवसेनेच्या अनिता करंजकर विजयी झाल्या होत्या. मात्र सध्याच्या या निकालामुळे राज्याच्या राजकारणातही भगूरचा निकाल चर्चेचा विषय ठरला आहे. भगूर नगरपरिषदेत तिरंगी लढत भगूर नगरपरिषदेत शिंदे गट आणि अजित पवार गट तसेच भाजप यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली. सत्ताधारी विजय करंजकर यांना पराभूत करण्यासाठी विरोधी पक्षांनी एकत्र येत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात स्थानिक उमेदवार विरुद्ध बाहेरील उमेदवार असा मुद्दा केंद्रस्थानी आला असून, त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले होते. हेही वाचा: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा औसा नगरपरिषदेवर ताबा ; 23 पैकी 17 जागांवर विजय