77th Republic Day : भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. कर्तव्यपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले आहे. त्यानंतर आता ३० चित्ररथांचे संचालन झाले. कर्तव्यपथावर एकूण 17 राज्यांचे चित्ररथ पाहायला मिळाले. या चित्ररथात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि गणेशोत्सवाचा उत्सव साकारण्यात आला आहे. महाराष्ट्राचा राज्यउत्सव असलेल्या गणेशोत्सवाचे सादरीकरण या ठिकाणी पाहायला मिळाले. गणपती बाप्पाच्या मन मोहून टाकणाऱ्या रूपासह महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वैभवाचे भव्य दर्शन घडले. या चित्ररथात गणपतीचं स्थान, गणपती विसर्जन आणि महाराष्ट्रातील अष्टविनायकाचं दर्शन घडवण्यात आलं आहे. या ठिकाणी ढोलताशे, लेझीम पथक देखील दाखवलं आहे. महाराष्ट्राचा चित्ररथ येताच केंद्रीय कॅबिनेट मंत्री पियुष गोयल आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी सन्मानाने उभे राहिले. Plane Crash : अमेरिकेत टेकऑफनंतर खाजगी जेट विमान कोसळले ; अपघातात विमानाला भीषण आग 77th Republic Day : चित्ररथात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि गणेशोत्सवाचा उत्सव महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये नेमकं काय? यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये मूर्तीकार, सजावट आणि प्रकाशयोजना करणारे कारागीर तसेच कलाकार, वादक, ढोल-ताशा पथक, फुलविक्रेते, वस्त्रव्यवसायिक पर्यावरणपूरक साहित्य निर्माते यांना मिळणाऱ्या रोजगाराची आणि त्यातून उभ्या राहणाऱ्या आर्थिक साखळीची प्रभावी मांडणी केली. गणेशोत्सवामुळे स्थानिक कारागिरांना कशी रोजगारनिर्मिती होते आणि हा उत्सव आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला कसा हातभार लावतो, हे चित्ररथाच्या माध्यमातून अधोरेखित केले. 77th Republic Day : Eknath Shinde : “सोन्याचा चमचा घेऊन जन्मलो नाही, पण…”; एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास 77th Republic Day : चित्ररथात महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा आणि गणेशोत्सवाचा उत्सव पथसंचलनात सहभागी होणारी राज्ये व केंद्रशासित प्रदेश कोणती होती? महाराष्ट्र, आसाम, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, केरळ, जम्मू-काश्मीर, मणिपूर, नागालँड, ओडिशा, पुदुच्चेरी, राजस्थान, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश. हेही वाचा: India-US Trade Deal : भारत-अमेरिका करारावरून गोंधळ ; ‘ती’ ऑडिओ क्लिप व्हायरल, सिनेटरचा ट्रम्प यांच्यावर गंभीर आरोप