Afghanistan snowfall – अफगाणिस्तानमध्ये पाऊस आणि हिमवर्षावामुळे किमान ६१ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत, असे देशाच्याआपत्ती व्यवस्थापन एजन्सीने म्हटले आहे. रस्त्यांवर बर्फ साचल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून रस्त्यावर साचलेले बर्फ हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. देशभरात ४५८ घरांचे अंशतः किंवा पुर्णतः नुकसान झाले आहे. अफगाणिस्तानच्या ३४ पैकी १५ प्रांतात कडाक्याच्या थंडीमुळे शेकडो जनावरेही मरण पावली आहेत. अजूनही काही प्रांतातील मृतांची आकडेवारी पुढे येत असल्यामुळे हा आकडा वाढण्याची शक्यता आहे, असे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन एजन्सीने म्हटले आहे. अफगाणिस्तानमध्ये कडाक्याची थंडी, अतिवृष्टी आणि पुरामुळे नेहमीच मोठे नुकसान होत असते. असाविपरीत हवामानामुळे दरवर्षी शेकडो लोकांचामृत्यू होत असतो. २०२४ साली अतिवृष्टीमुळे ३०० जण मरण पावले होते. भूकंपाचा धक्का.! अफगाणिस्तानला आज ४.१ क्षमतेच्या भूकंपाचा धक्का बसला. भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात १० किलोमीटरवर होता. या भूकंपाचे काही आफ्टरशॉक देखील जाणवले. मात्र यामुळे कोठेही कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही. अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील भागाला गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये भूकंपाचा धक्का बसला होता. त्यातून हा भाग अजूनही सावरलेला नाही. या दोन्ही भूकंपांच्या धक्क्यांमुळे अफगाणिस्तानमध्ये शेकडो गावांचे नुकसान झाले होते आणि २,२०० ठार झाले होते.