अजिंक्‍यतारा कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

कार्यकारी संचालक संजीव देसाई यांना बेस्ट मॅनेजिंग डायरेक्‍टर अवॉर्ड 

सातारा – शेंद्रे, येथील अजिंक्‍यतारा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक संजीव देसाई यांना भारतीय शुगर ऑर्गनायझेशनचे 2019 चा “बेस्ट मॅनेजिंग डायरेक्‍टर अवॉर्ड” जाहीर झाले आहे. त्यामुळे कारखान्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

साखर उद्योगात प्रशासकीय कामकाजाची प्रगती, कार्याचे मूल्यमापन व साखर उद्योगामध्ये योगदान आदी बाबी विचारात घेऊन भारतीय शुगर या संस्थेकडून महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश व इतर राज्यातील साखर उद्योगातील कामगिरीबद्दल बेस्ट ओव्हरऑल परफॉर्मन्स, लाइफटाइम अचीव्हमेंट, बेस्ट कन्संल्टंट, शुगर केन ग्रोअर आयकॉन, आदी पुरस्कार दिले जातात.

अजिंक्‍यतारा कारखान्याचे गुणवत्तापूर्वक कामकाज, सहकार क्षेत्रातील कामगिरी, व्यवसायिक दृष्टीकोन, शेतकऱ्यांची ऊस बिले वेळेत अदा करणे, संस्थेचे नेट वर्थ, गाळप क्षमतेचा वापर, तांत्रिक सुधारणा या बाबी विचारात घेऊन संजीव देसाई यांना संस्थेने पुरस्कार जाहीर केला आहे. भारतीय शुगरचे चेअरमन विक्रमसिंह शिंदे व जनरल मॅनेजर संग्रामसिंह शिंदे यांनी कारखाना स्थळावर येऊन अवॉर्डबाबत पत्र दिले.

पुरस्कार वितरण दि. 21 सप्टेंबर रोजी कोल्हापूर येथे होणार आहे. कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे कुशल नेतृत्व आणि संचालक मंडळाची मोलाची साथ यामुळेच आपल्याला हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल देसाई यांनी त्यांचे आभार मानले. वेदांतिकाराजे भोसले, कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, उपाध्यक्ष विश्‍वासराव शेडगे, संचालक, अधिकारी, कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संजीव देसाई यांचे अभिनंदन केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)