पालिका हद्दीचा सुधारित नकाशा अखेर खुला

नागरिकांच्या हरकती, सूचना मागविणार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मंजूर विकास योजना सुधारित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या विकास योजनेत समाविष्ट असलेल्या क्षेत्राच्या हद्दी दर्शवणारा नकाशा नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. नागरिकांच्या अवलोकनासाठी महापालिका कार्यालयात नकाशा ठेवण्यात येणार आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्यात येणार आहेत.
महापालिकेची मंजूर विकास योजना सुधारित करण्यासाठी सर्वेक्षण करणे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जमीन वापर नकाशा व इतर कामे खासगी संस्थेमार्फत करुन घेण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यास महासभेने 21 नोव्हेंबर 2013 रोजी मान्यता दिली आहे. महापालिकेच्या संपूर्ण क्षेत्राची (जुन्या व वाढीव हद्दीसाठी) विकास योजना तयार करण्याचा ठराव 5 फेब्रुवारी 2018 रोजी महासभेने मंजूर केला आहे. त्यानुसार निविदा कार्यवाही करुन खासगी संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थेस 8 मार्च 2019 रोजी कामाचा आदेश दिला आहे.

महापालिकेला मंजूर विकास योजना सुधारित करण्याबाबतचा इरादा जाहीर करणे आवश्‍यक आहे. या विकास योजनेत समाविष्ट असलेल्या क्षेत्राच्या हद्दी दर्शवणारा नकाशा नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. महापालिकेच्या कार्यालयात नागरिकांच्या अवलोकनासाठी नकाशा ठेवण्यात येणार आहे. त्यावर नागरिकांच्या हरकती, सूचना मागविण्यात येणार आहेत. 60 दिवसांच्या कालावधीत येणाऱ्या सूचना, हरकतींचा विकास योजना तयार करताना विचार केला जाणार आहे. सुधारित विकास योजना तयार करण्याचा इरादा सरकारच्या राजपत्रात आणि वृत्तपत्रात प्रसिद्ध केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)