कापूरहोळ – पुरंदर, बारामती, इंदापूर, दौंड व भोर मतदार संघातील भारतीय जनता पक्षाच्या इच्छुकांच्या मंगळवारी (दि. 27) सकाळी 11 वाजता सासवड येथील दादा जाधवराव सभागृहत मुलाखती होणार आहेत. इच्छुकांनी यासाठी हजर राहावे, असे आवाहन भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी केले आहे. top news marathi latest news Interviews of BJP candidates in Bhor constituency tomorrow
कापूरहोळ (ता. भोर) येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, गणेश निगडे, प्रदीप खोपडे, नागेंद्र चौबे, विश्वास ननावरे उपस्थित होते. भाजपच्या वतीने पुणे ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निरीक्षक म्हणून रायगडचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची नियुक्ती केली आहे. मुलाखतीनंतर चव्हाण पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.