मिनी मंत्रालयावर कोणाची सत्ता येणार? Top 10 news: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी पार पडलेल्या मतदानाचा निकाल आज जाहीर होणार आहे. जिल्हा परिषदेच्या 731 तर पंचायत समित्यांच्या 1,462 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. या निकालात कोणता पक्ष बाजी मारणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. साधारण चार ते पाच तासांमध्ये या निकालाचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या 12 जिल्हापरिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या 125 पंचायत समित्यांसाठी सरासरी 68.28 टक्के मतदान झाले होते. या निवडणुकांचे वर्णन मिनी मंत्रालय असे करण्यात येते. ग्रामीण भागातील विकासकामे आणि निधीवाटपाच्यादृष्टीने पंचायत समिती आणि जिल्हा परिषदा महत्त्वाच्या असतात. त्यामुळे याठिकाणी आता कोणाची सत्ता येणार, हे आज स्पष्ट होईल. Maharashtra Elections 2026 : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा आज फैसला; थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात निवडणुकांसाठी दोन मुलांची अट रद्द ? भारतात निवडणूक लढवण्याचे नियम प्रत्येक राज्यात वेगवेगळी आहेत. निवडणुकांसंदर्भात राजस्थान राज्य सरकारनं मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी दोन मुलांची अट रद्द केली जाण्याची शक्यता आहे. तीन दशकांपासून सुरू असलेला हा नियम रद्द करण्यासाठी सरकारने पावले उचलली आहेत. विधानसभेत सादर केलेल्या सरकारच्या उत्तरात तीन किंवा त्याहून अधिक मुले असलेल्या व्यक्ती आता नगरपालिका आणि पंचायत निवडणुका लढवण्यास पात्र ठरू शकते. सरकारचा हा निर्णय “मिशन २०२६” चा एक भाग असल्याचे मानले जात आहे. याचा उद्देश ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात व्यापक सामाजिक सहभाग सुनिश्चित करणे आहे. लोकशाहीमध्ये निवडणूक लढवण्याचा अधिकार कुटुंबाच्या आकाराशी जोडला जाऊ नये असे सरकारकडून सांगण्यात येत आहे.सरकार लवकरच या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया आणि सुधारणा अंतिम करेल अशी अपेक्षा आहे. अजित पवारांच्या विमान अपघातामागील सत्य काय? Top 10 news: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतरही त्यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांकडून अजित पवारांच्या अपघाताबाबत सवाल उपस्थित केले जात आहे. अजित पवारांच्या पायलटला हिप्नोटाइज केल होते का? त्याला आमिष दाखवलं होत कां? असा सवाल अमोल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान पवार कुटुंबातील सदस्य अजित पवारांचे पुतणे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार १० फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेऊन मोठा खुलासा करणार असल्याची माहिती आहे, ते म्हणाले की, हा मृत्यू नैसर्गिक नव्हता. असे अनेक प्रश्न आहेत जे अनुत्तरीत आहेत. त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. ते १० फेब्रुवारी रोजी या प्रश्नांची सविस्तर उत्तरे देतील. मुंबईतून बांगलादेशींना हद्दपार करणार महापौरांचा इशारा मुंबई महापालिकेच्या महापौरपदाची सूत्र हाती घेताच भाजपच्या रितू तावडेंनी थेट मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा प्रकर्षानं मांडलाय. मुंबईतून बांगलादेशींना बाहेर काढणार, असा इशारा रितू तावडेंनी दिलाय.. त्यामुळे मुंबईच्या राजकारणात ‘बांगलादेशी घुसखोर’चा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आलाय.दरम्यान भाजपच्या नवनिर्वाचित महापौरानं बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार करण्याची भाषा केल्यावर हिंदूंची हत्या करणाऱ्या बांगलादेशला केंद्र सरकार मदत करत असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. तर राऊतांच्या दाव्याला भाजपने प्रत्युत्तर दिलंय. मुंबईसह पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण-डोंबिवली इथं बांगलादेशी घुसखोर सापडत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बांगलादेशी नागरीकांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिलेत. महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना तेलंगणामधील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यावर विटंबना झाल्याची घटना घडली. या घटनेचे संपूर्ण भारतात पडसाद उमटू लागले आहेत. जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. या निंदनीय कृत्याचा सर्वच स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.त्यात तेलंगणा राज्यातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापुर गावात क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यावर समाजकंटकांनी हल्ला केला आहे. त्यांनी केलेल्या विटंबनेची घटना निंदनीय आहे. ही फक्त जोतिबांच्या पुतळ्याची विटंबना नसून सामाजिक विचारांवर आणि समतेच्या मूल्यांवर केलेला आघात आहे’.असं त्यांनी म्हटलंय. महाशिवरात्री दिवशी भीमाशंकर मंदिर बंद Top 10 news: कुंभमेळ्याच्या वेळेस श्री.क्षेत्र भिमाशंकर येथे होणाऱ्या गर्दीचे प्रमाण लक्षात घेता जूना सभामंडपाचे क्षेत्र कमी पडणार असल्यामुळे नवीन भव्य सभामंडपाचे काम हाती घेण्यात आलेले असून त्याबरोबरच पायरी मार्गाचे काम देखील सुरू करण्यात आलेले आहे. मुख्य सभामंडप पुर्णत उतरविण्यात आल्यामुळे नवीन सभामंडप तयार करताना श्री भिमाशंकर येथे रोज होणारी गर्दी लक्षात घेता मंदीर दर्शनासाठी बंद केल्याशिवाय हे काम करणे शक्य होणार नव्हते. तसेच या कामांच्या अंमलबजावणीदरम्यान बांधकाम साहित्य, मोठ्या आकाराचे दगड आणि अन्य यंत्रसामग्री मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे महाशिवरात्री कालावधीत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी तसा निर्णय घेतला आहे. काँग्रेसची ८ राज्यांसोबत मोठी बैठक काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि सध्याच्या राजकीय मुद्द्यांवर रणनीती आखण्यासाठी आठ राज्यांचे प्रभारी, प्रदेशाध्यक्ष, विधिमंडळ पक्ष नेते आणि जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्षांची एक महत्त्वाची बैठक बोलावली आहे. ही बैठक १० फेब्रुवारी रोजी सकाळी १०:०० वाजता काँग्रेस मुख्यालय, इंदिरा भवन येथे होणार आहे.विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस संघटनेचे महासचिव के.सी. वेणुगोपाल देखील या महत्त्वाच्या बैठकीत उपस्थित राहतील. जम्मू-काश्मीर, पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, झारखंड, छत्तीसगड, ओडिशा आणि तामिळनाडूशी संबंधित संघटनात्मक आणि राजकीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल. त्यासोबतच मनरेगाशी संबंधित मुद्दे आणि भारत-अमेरिका संभाव्य व्यापार करारामुळे शेतकऱ्यांना होणारे संभाव्य नुकसान यावरही सविस्तर चर्चा केली जाईल. भारत-अमेरिका व्यापार करारामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाबद्दल जनतेपर्यंत कसे पोहोचायचे यावर या बैठकीत लक्ष केंद्रित केले जाईल. या मुद्द्यावर संपूर्ण रणनीती तयार केली जाईल. जपानमध्ये पुन्हा एकदा साने ताकाचीचे सरकार जपानमध्ये, पंतप्रधान साने ताकाची यांच्या नेतृत्वाखालील लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी (एलडीपी) विक्रमी विजयासह सत्तेत परतत आहे. काल झालेल्या संसदीय निवडणुकीत सत्ताधारी पक्षाने दोन तृतीयांश बहुमत मिळवलं असल्याचं जपानी माध्यमांनी म्हटलं आहे. संसदीय निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड विजयानंतर, जपानी पंतप्रधानांनी सार्वजनिक दूरचित्रवाणी नेटवर्क एनएचकेला दिलेल्या मुलाखतीत,त्यांचे लक्ष जपानचा विकास आणि बळकटीकरण करणारी धोरणे पुढे नेण्यावर असेल.”असं सांगितलं. विजयानंतर, ताकाची एलडीपी मुख्यालयात पोहोचल्या, जिथे त्यांनी आनंद साजरा केला. इंग्लडचा 4 धावांनी रोमांचक विजय टी-20 वर्ल्डकप 2026 मधील पाचव्या सामन्यात मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड आणि नेपाळ आमनेसामने होते. या सामन्यात मोठा उलटफेर होण्याची शक्यता निर्माण झाली होती, पण अखेर इंग्लंडने अनुभवाच्या जोरावर सामना आपल्या बाजूने वळवला आणि अवघ्या 4 धावांनी रोमांचक विजय मिळवला. सामन्याच्या एका टप्प्यावर नेपाळ सहजपणे इंग्लंडला पराभूत करेल असे चित्र दिसत होते. मात्र, निर्णायक क्षणी इंग्लिश खेळाडूंनी जबरदस्त पुनरागमन करत सामन्यावर पकड मिळवली. सामन्याच्या शेवटच्या षटकात नेपाळला विजयासाठी 10 धावा हव्या होत्या. त्या निर्णायक क्षणी सॅम करणने अचूक यॉर्कर टाकत केवळ 5 धावा दिल्या आणि इंग्लंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या कामगिरीमुळे सॅम करण सामन्याचा खरा हिरो ठरला.184 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळचा संघ 20 षटकांत 180/6 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विजय अगदी हातात असतानाच संघाला केवळ 4 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. इंग्लंडकडून गोलंदाजीत लियाम डॉसनने 2 विकेट्स घेतल्या, तर ल्यूक वूड, जोफ्रा आर्चर, विल जॅक्स आणि सॅम कर्रन यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला. बिग बॉस मराठी’च्या घरात राखी सावंतची एन्ट्री ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनची संपूर्ण देशभरात चर्चा सुरू आहे. यंदा शोमध्ये पहिली वाइल्ड कार्ड एन्ट्री कोण घेणार? याची सगळेजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तिच्या धमाकेदार एन्ट्रीचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. बिग बॉस मराठी’ सीझन ६ च्या घरात पहिली वाइल्ड कार्ड स्पर्धक राखी सावंतची एन्ट्री झाली आहे. राखी सावंत घरात पूर्ण मनोरंजनाची त्सुनामी घेऊन येणार आहे. Ayesha Khan: ‘मी रडू लागले होते’…. आयशा खानने पीरियड्समध्ये ‘धुरंधर’मधील ‘शरारत’ गाण्याचं केलं शूटिंग आतापर्यंत तयार झालेली समीकरणं, नाती, गटबाजी आणि स्पर्धकांमधले गैरसमज…या सगळ्यावर राखी प्रश्न उपस्थित करेल. तिच्या आगमनाने घरातल्या प्रत्येक सदस्याचा गेम हादरणार हे नक्की आहे. कोणाशी मैत्री, कोणाशी वाद, कोणाच्या नसा दाबायच्या आणि कोणाला भावनिकरित्या गोंजारायचं हे सगळं राखीच्या खेळात नेहमीच असतं. त्यामुळे राखीच्या एन्ट्रीने महाराष्ट्राला मनोरंजनाचा भारी डोस मिळणार आहे.