Raja Chaudhary interview: ‘मुलीच्या बदल्यात फ्लॅट घेतला?’ श्वेता तिवारीच्या आरोपांवर राजा चौधरीचं पहिल्यांदाच सविस्तर उत्तर
Raja Chaudhary interview श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांनी १९९८ मध्ये प्रेमविवाह केला होता. कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केलं. काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात मतभेद वाढले. श्वेताने राजावर कौटुंबिक हिंसाचारासह अनेक गंभीर आरोप केले. २००७ मध्ये तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि अखेर २०१२ मध्ये दोघांचा कायदेशीर घटस्फोट झाला.

Raja Chaudhary interview: टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी आणि तिचा माजी पती राजा चौधरी यांचा घटस्फोट अनेक वर्षांपूर्वी झाला असला, तरी त्यांच्या वैवाहिक आयुष्याबाबतच्या चर्चा आजही थांबलेल्या नाहीत. यावेळी पुन्हा एकदा दोघेही चर्चेत आले आहेत. कारण, श्वेता तिवारीने यापूर्वी केलेल्या एका दाव्यावर राजा चौधरीने आता पहिल्यांदाच सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. (Raja Chaudhary interview)
श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांनी १९९८ मध्ये प्रेमविवाह केला होता. कुटुंबाच्या विरोधात जाऊन त्यांनी लग्न केलं. काही वर्षांनंतर त्यांच्या नात्यात मतभेद वाढले. श्वेताने राजावर कौटुंबिक हिंसाचारासह अनेक गंभीर आरोप केले. २००७ मध्ये तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आणि अखेर २०१२ मध्ये दोघांचा कायदेशीर घटस्फोट झाला.
या नात्यातून त्यांना पलक तिवारी ही मुलगी आहे. घटस्फोटानंतर पलकचा ताबा श्वेता तिवारीकडे राहिला. याच काळात राजा चौधरीने मुलीच्या ताब्याचा हक्क सोडण्यासाठी श्वेताकडून मालाडमधील एक फ्लॅट स्वतःच्या नावावर करून घेतल्याचा दावा अनेक वर्षांपासून केला जात आहे. (Raja Chaudhary interview)
श्वेता तिवारीने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, घटस्फोटापूर्वी राजाने मालाडमधील वन बीएचके फ्लॅट स्वतःच्या नावावर करण्याची अट घातली होती. तिच्या म्हणण्यानुसार, तिने फ्लॅटची मालकी पलक आणि राजा या दोघांच्या नावावर करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र, राजाने तो नाकारला. श्वेताचा दावा होता की, “मला फ्लॅट दे, मग मी घटस्फोट देईन आणि मुलीवर दावा करणार नाही,” अशी भूमिका राजाने घेतली होती. (Raja Chaudhary interview)

Shweta Tiwari, Raja Chaudhary
आता या आरोपांवर राजा चौधरीने सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत आपली बाजू मांडली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, २००७ ते २०१२ या काळात घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात सुरू होते. तो प्रत्येक सुनावणीला उपस्थित राहत होता. न्यायालयाने पलकला ठराविक ठिकाणी भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र, श्वेता तिला भेटण्यासाठी कधीच घेऊन आली नाही, असा आरोपही त्याने केला. (Raja Chaudhary interview)
राजा चौधरीने फ्लॅटबाबतही स्पष्टीकरण दिले. त्याने सांगितले की, लग्नानंतर त्याच्या वडिलांनी सुमारे ९ लाख रुपयांना मालाडमधील हा वन बीएचके फ्लॅट खरेदी केला होता. सुरुवातीची रक्कम वडिलांनी भरली होती, तर पुढील हप्ते तो आणि श्वेता यांनी मिळून भरले होते. (Raja Chaudhary interview)
घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान आपल्याला कोणतीही मालमत्ता नको होती, मात्र राहण्यासाठी स्वतःचं घर हवं होतं, असं राजा म्हणाला. “त्या काळात मला भाड्याने घर मिळणंही कठीण झालं होतं. त्यामुळे मी श्वेताला फक्त हा फ्लॅट मला दे, बाकी सर्व काही तू ठेव. मला फक्त शांततेत आयुष्य जगायचं आहे, असं सांगितलं होतं,” असे त्याने स्पष्ट केले.
मुलीच्या बदल्यात फ्लॅट घेतल्याचा आरोप मात्र राजाने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला. “एखादा वडील आपल्या मुलीचा त्याग कसा करू शकतो? राहण्यासाठी घर मागितलं म्हणजे मुलीचा त्याग केला, असा अर्थ कसा काढला जाऊ शकतो? मुलगी आणि संपत्ती यांची तुलना होऊच शकत नाही. या प्रकरणामुळे माझी प्रतिमा चुकीच्या पद्धतीने मांडली गेली,” असेही तो म्हणाला.
दरम्यान, श्वेता तिवारी किंवा तिच्या टीमकडून राजा चौधरीच्या या नव्या दाव्यांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
घटस्फोटाला अनेक वर्षे उलटल्यानंतरही श्वेता तिवारी आणि राजा चौधरी यांच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित दावे-प्रतिदावे समोर येत आहेत. मात्र, या सर्व मुद्द्यांवर दोघांची भूमिका वेगवेगळी असल्याने सत्य काय आहे, याबाबत अधिकृत न्यायालयीन नोंदी आणि संबंधित पक्षांची विधानेच महत्त्वाची ठरतात.





