Tomato Soup Benefits: थंड संध्याकाळी उबदारपणा आणि चव देईल टोमॅटो सूप; घरी करा अगदी सोप्या पद्धतीने

Tomato Soup Benefits: सध्या हिवाळ्याचे दिवस सुरू आहेत. संध्याकाळी थोडी थंडी जाणवू लागते आणि काहीतरी गरम पिण्याची इच्छा होते. अशा वेळी एक कप गरम टोमॅटो सूप शरीराला उब देतेच, पण चव आणि आरामही मिळतो. टोमॅटो सूप हलक आणि पौष्टिक असल्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तो उत्तम पर्याय मानला जातो.
टोमॅटो सूप पिण्याचे फायदे
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि लाइकोपीन असतात. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, त्वचा आणि केस निरोगी राहतात तसेच हृदयाच्या आरोग्यासही फायदा होतो. थंडी, सर्दी आणि खोकल्यातही टोमॅटो सूप उपयोगी ठरतो.
टोमॅटो सूपसाठी लागणारी सामग्री
- ४ मोठे टोमॅटो (चिरलेले)
- ४ ते ५ लसूण पाकळ्या
- थोडं आलं
- १ हिरवी मिरची
- १ चमचा तूप
- अर्धा छोटा चमचा भाजलेले जिरे पूड
- पाव छोटा चमचा काळी मिरी पूड
- एक चिमूट हिंग
- चवीनुसार मीठ
- थोडासा गूळ
- सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर
सूप बनवण्याची पद्धत
सर्वात आधी टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरवी मिरची एकत्र उकळून घ्या. हे थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि गाळणीने गाळून घ्या.
आता एका कढईत तूप गरम करा. त्यात हिंग घालून टमाटरचं मिश्रण टाका. त्यानंतर मीठ, जिरे पूड, काळी मिरी आणि थोडासा गूळ घाला. हे सूप मंद आचेवर ५ ते ७ मिनिटं उकळू द्या. वरून कोथिंबीर घालून गरमागरम सूप सर्व्ह करा. हा टमाटर सूप चवीला मस्त तर लागतोच, शिवाय थंडीच्या दिवसांत शरीराला उब आणि आराम देतो.





