Tokyo Paralympics : गुगलकडून पॅरालिम्पिकवर डुडल
Updated On:

नवी दिल्ली – टोकियोत सुरू झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेला जागतिक स्तरावर गांभीर्याने घेतले जात असून खेळाडूंच्या कामगिरीवरही कौतुकाचा वर्षाव होत असतो. हे पाहून या स्पर्धेला तसेच खेळाडूंनाही प्रोत्साहीत करण्यासाठी गुगलने खास पॅरालिम्पिक डुडल तयार केले.
मंगळवारपासून सुरू झालेल्या यंदाच्या स्पर्धेत जगभरातील पॅरा खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. गुगलने देखील पॅरालिम्पिक्स खेळासांठी एक खास डूडल तयार केले असून या डूडलवर क्लिक करताच एक ऍनिमेटेड व्हिडीओही पाहायला मिळतो.
या व्हिडीओसह एक फ्लॅश गेमही प्रेक्षकांना विनामूल्य खेळता येणार आहे.






