बीड – बीडच्या आष्टी तालुक्यात भाऊ-बहिणीचा शेततळ्यात बुडुन मृत्यू झाला आहे. रविवारी सकाळी ८:१५ वाजता टाकळसिंग गावात श्रावणी चव्हाण (१०) आणि तिचा भाऊ श्रवण (८) खेळत असताना ही घटना घडली. ते मुळचे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील कुसवडगाव येथील रहिवासी आहेत. त्यांचे वडील रोहिदास चव्हाण (३५) नुकतेच कुटुंबासह रोजंदारीसाठी टाकळसिंग येथे आले होते. अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असे आष्टी पोलिसांनी सांगितले.