Sambhaji Chhatrapati : आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच: संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर: देशमुख हत्या प्रकरणाचे क्रूरतेचा कळस गाठणारे फोटो माध्यमांत व्हायरल झाले. या फोटोंनंतर सर्व स्तरातून तीव्र स्वरुपाच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचे समोर आले. यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली होती. अखेर धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवरून वैद्यकीय कारण पुढे करत राजीनामा देत असल्याचे ट्वीट केले. त्यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अशातच स्वराज्य पक्षाचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी एक्स या त्यांच्या अकाऊंटवर याविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर पडले, यामुळे केवळ या प्रकरणातील आरोपींचेच नाही तर या आरोपींना पोसणाऱ्या, पाठीशी घालणाऱ्या अनेकांचे चेहरे व या चेहऱ्यांमागची विकृती उघडी पडली असल्याचे संभाजीराजे म्हणाले आहेत. किंचितही नैतिकता असती तर अडीच महिन्यांपूर्वीच हा राजीनामा दिला गेला असता, असा सवाल उपस्थित करत राजीनाम्याच्या मागणीकडे अडीच महिने दुर्लक्ष केले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आजचा राजीनामा ही एकप्रकाराची कबुलीच असल्याचे संभाजीराजेंनी मुंडेंनी दिलेल्या राजीनाम्यावर भाष्य करताना म्हटले आहे.
नेमकं काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?
या क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच असल्याचे जाहिरपणे सांगून नि:पक्षपातीपणे या प्रकरणाचा तपास व्हावा, यासाठी धनंजय मुंडेला मंत्रीपदच देऊ नये, अशी मागणी आम्ही अडीच महिन्यांपूर्वी केली होती. मात्र लोकभावना बासनात गुंडाळून मुंडेला मंत्रिपद दिले गेले. राजीनाम्याच्या मागणीकडेही अडीच महिने दुर्लक्ष केले गेले. किंचितही नैतिकता असती तर अडीच महिन्यांपूर्वीच हा राजीनामा दिला गेला असता. मंत्रिपदाचे कवच घालून आरोपपत्र दाखल होण्याची वाट पाहत होता का ? आजचा राजीनामा ही एकप्रकारची कबुलीच आहे!
संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर पडले, यामुळे केवळ या प्रकरणातील आरोपींचेच नाही तर या आरोपींना पोसणाऱ्या, पाठीशी घालणाऱ्या अनेकांचे चेहरे व या चेहऱ्यांमागची विकृती उघडी पडली आहे. या क्रूर गुन्हेगारांचा आश्रयदाता धनंजय मुंडेच असल्याचे जाहिरपणे सांगून नि:पक्षपातीपणे या…
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) March 4, 2025





