मेष : व्यवसायात खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल. कृतीवर भर देऊन कामे वेळेत संपवा. वृषभ : उलाढाल वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. नोकरीत अनपेक्षित लाभ मिळेल. प्रवासाचे योग येतील. मिथुन : फायद्याचे प्रमाण वाढेल. नवीन कामे हितचिंतकांच्या मदतीने मिळतील. ईप्सित साध्य होईल. कर्क : कामाचे गणित बसवून कामे संपवा. धावपळ दगदग जरी वाढली तरी आर्थिक लाभही वाढणार आहेत. सिंह : व्यवसायात हटवादी स्वभावामुळे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्या. नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. कन्या : जुनी येणी वसुलीवर लक्ष केंद्रित केलेत तर पैशाची ऊब मिळेल. मोहापायी चुकीच्या व्यक्तींशी संगत टाळा. तूळ : कधी शक्ती तर कधी युक्तीने उलाढाल व विक्री वाढवाल. नवीन कामे मिळतील. नोकरीत नवीन दिशा मिळेल. वृश्चिक : बेत प्रत्यक्षात साकार होतील. टाळता न येणारे खर्च करावे लागतील. भविष्यात त्यातून फायदाच होईल. धनू : व्यवसायात वेळ व काळाचे बंधन पाळून काम करण्याचा मानस असेल. त्यामुळे मोठी उडीही घेता येईल. मकर : कार्यपद्धतीत बदल करून उलाढाल व फायदा वाढवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होईल. कुंभ : व्यवसायात स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ठोस पावले उचलाल. जोडधंदयातून विशेष लाभ होईल. मीन : बाजारातील चढउतारांकडे मात्र लक्ष ठेवावे लागेल. खेळत्या भांडवलाची तरतूद करावी लागेल.