मेष : या सप्ताहात मिळालेल्या संधीचे सोने करा. जास्तीत जास्त लाभ घेण्याकडे कल राहील. वृषभ : व्यवसायात महत्वाच्या कामांना प्राधान्य व कामाचा झपाटा उत्तम राहील. मनोकामना पूर्ण होईल. मिथुन : तुमच्या प्रयत्नांना अचूक अंदाजाची जोड लाभेल. नोकरीत मनाप्रमाणे काम करण्याचे समाधान मिळेल. कर्क : आवडत्या छंदात वेळ मजेत घालवता येईल. नवीन हितसंबंध जोडले जातील. सुखद प्रसंग साजरे होतील. सिंह : तुमच्या कामाचे कौतुक होईल. महिलांना स्वास्थ्य लाभेल. पैशाची स्थिती समाधानकारक राहील. कन्या : कामाचे वेळी काम करुन इतर वेळी जीवनाचा पूरेपूर आस्वाद घेण्याकडे कल राहील. तूळ : व्यवसायात धोरणात्मक निर्णय घ्याल. नेहमीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न राहील. वृश्चिक : नोकरीत अत्यावश्यक कामांना प्राधान्य द्याल व इतर कामे सोयीस्करपणे लांबणीवर टाकाल. धनू : बोलल्याने गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्या. विचारापेक्षा कृतीवर भर दया. मनोकामना पूर्ण होईल. मकर : घरात कुटुंब समवेत प्रवासाचे बेत सफल होतील. तुमच्या कामातील गुणांची कदर सर्वजण करतील. कुंभ : महिलांना मनाप्रमाणे वागण्याची मुभा मिळेल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. महिलांना स्वास्थ्य लाभेल. मीन : या सप्ताहात मिळालेल्या संधीचे सोने करा. जास्तीत जास्त लाभ घेण्याकडे कल राहील.