पुणे – राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या परिवार संवाद यात्रेनिमित्ताने दि. 24 आणि 25 फेब्रुवारी रोजी पुण्यात बैठकांचे नियोजन करण्यात आले. मात्र, नवाब मलिक यांच्यावरील कारवाईच्या पार्श्वभूमीवर या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पक्षाची गुरूवारची (दि. 24) बैठक पुढे
ढकलण्यात आली असून, शुक्रवारची (दि. 25) बैठक नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे, असे पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले. गुरुवारची बैठक आता 1 मार्च रोजी घेण्यात येणार आहे. तर 25 फेब्रुवारीची बैठक नियोजनानुसार होणार आहेत.