Pimpri News | आज ठरणार, कोण होणार आमदार?

पिंपरी, – संपूर्ण राज्यासह देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. शनिवारी सकाळी 8 वाजता राज्यातील सर्व मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात होईल. शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघातील मतदानाची आकडेवारी वाढली असून, आज होणार्या मतमोजणीचा कौल नेमका कोणाच्या बाजूने लागणार आहे? याची उमेदवारांसह सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना उत्सुकता लागली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (दि.20) मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर गुरुवारी कार्यकर्त्यांनी कित्येक दिवसांनंतर आराम केला. मात्र त्यानंतर मतदान कुठे किती झाले कोणत्या सोसायटीतून, वसाहतीतून मतदान झाले याचा ठिकठिकाणी उमेदवार आणि कार्यकर्ते अभ्यास करीत होते. तर निवडणूक विभागाच्या अधिकार्यांनी मतमोजणीसाठी कोणत्या विभागात किती टेबल, त्यावर किती कर्मचारी, उमेदवारांचे किती प्रतिनिधी याबाबतही अनेकांनी नियोजन केले. त्यानुसार कार्यकर्त्यांच्या नेमणूका करणे याचे नियोजन केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील तीन मतदारसंघांनी बुधवारी आपला कारभारी ठरविला. चारही मतदारसंघांत चुरशीने मतदान झाले. चिंचवड विधानसभा मतदारसंघात 58.39 टक्के तर पिंपरी विधानसभा मतदारसंघात 51.78 टक्के आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात 61.54 टक्के इतके मतदान झाले आहे. गेल्या वेळच्या तुलनेमध्ये यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. निवडणूक आयोगाने मतदार जागृतीवर भर दिल्याने मतदानाचा उत्साह दिसून आला. शनिवारी (दि.23) मतमोजणी होणार आहे.
कार्यकर्त्यांकडून मतदानाचा अंदाज
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडल्यानंतर कोणत्या परिसरात किती मतदार मतदानासाठी उतरले, तर कोणत्या परिसरातील मतदार कमी आले यावरून उमेदवाराला किती मते मिळतील याचा अंदाज बांधण्याच्या कामाला कार्यकर्ते लागले होते. तर अनेक उमेदवारांनी आता मतमोजणीसाठी कार्यकर्ते तयार करण्यास सुरूवात केली आहे.
पिंपरी विधानसभा मतदारसंघ
शहरातील या सर्वांत लहान मतदारसंघात मतदारसंख्या कमी असूनही सर्वांत कमी मतदानाची परंपरा कायम राहिली आहे. या मतदारसंघात ०००० पुरुष आणि ०००० स्त्री व ०० इतर अशा एकूण ००००० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदारसंघाचा आजवरचा इतिहास पाहता या मतदारासंघात विजयाचे अंतर नेहमीच कमी राहिले आहे. यामुळे येथे चुरशीची लढत होते. २००९ साली या मतदारसंघात राष्टवादी काॅंग्रेसचे अण्णा बनसोडे ९५२७ मतांनी विजयी झाले होते. २०१४ साली शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार अवघ्या २३३५ मतांनी विजयी झाले होते. २०१९ साली पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे १९८०८ मतांनी विजयी झाले. यंदा या मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुलक्षणा शिलवंत-धर तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून अण्णा बनसोडे मैदानात आहेत. या व्यतिरिक्त वंचित बहुजन आघाडी, बसपा, महाराष्ट्र स्वराज्य पार्टी व अपक्ष असे एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ
शहरातील सर्वांत मोठ्या मतदारसंघात ०००० पुरुष आणि ०००० स्त्री व ०० इतर अशा एकूण ००००० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदारसंघाचा आजवरचा इतिहास पाहता या मतदारासंघात २००९ पासून आजपर्यंत येथे भाजप व्यतिरिक्त इतर कोणताही पक्ष कधीच विजयी होऊ शकला नाही. मतदारसंघ अस्ितत्वात आल्यापासून या मतदारसंघावर जगताप कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. आजवर येथे जगतापांशिवाय कधीच दुसरा कुणीही उमेदवार जिंकू शकला नाही. २००९ साली अपक्ष उमेदवार म्हणून स्व. लक्ष्मण जगताप ६५७५ मतांनी विजयी झाले होते. २०१४ आणि २०१९ साली लक्ष्मण जगताप यांनी भाजपकडून निवडणूक लढवत अनुक्रमे ६०२९७ आणि ३८४९८ मतांनी विजयी झाले. २०२३ साली त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी आमदार अश्विनी जगताप ३६१६८ मतांनी विजयी झाल्या होत्या. यंदा या मतदारसंघातून भाजपकडून शंकर जगताप आणि राष्ट्रवादीकडून राहुल कलाटे तसेच अपक्ष उमेदवार भाऊसाहेब भोईर यांच्यासह इतर लहान पक्ष व अपदक्ष असे एकूण





