#IPL2019 : चेन्नईचा विजयरथ रोखण्याचे मुंबईपुढे आव्हान

चेन्नई सुपर किंग्ज Vs मुंबई इंडियन्स

वेळ – रात्री 8 वा.
स्थळ – वानखेडे क्रिकेट मैदान, मुंबई

मुंबई -आयपीएलच्या मागील मोसमातील विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने याही मोसमाच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत आपल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल स्थान कायम राखले असून मुंबई इंडियन्सची या मोसमाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झालेली नसून आपल्या तीन सामन्यापैकी केवळ एका सामन्यात त्यांना विजय मिळवता आला आहे तर दोन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे ते क्रमवारीत खालून तिसऱ्या स्थानी आहे.

आयपीएलच्या गत मोसमात दोन वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करत चेन्नई सुपर किंग्जने धडाकेबाज कामगिरी करत स्पर्धेचे विजेतेपद तिसऱ्यांदा पटकावले. मागच्या मोसमातील आपला फॉर्म कायम राखत चेन्नईच्या संघाने यंदाच्या मोसमात सुरुवातीच्या सामन्यापासून प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवत तीनही सामने जिंकले आहेत. ज्यात पहिल्या सामन्यामध्ये त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला केवळ 70 धावांमध्येच बाद करत सामना सहज जिंकला. तर, दुसऱ्या सामन्यात त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा सहा गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर तिसऱ्या सामन्यात त्यांच्या फलंदाज आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरी करत राजस्थानच्या संघाचा पराभव केला.

दुसरीकडे पहिल्या सामन्यात मुंबईच्या बलाढ्य गोलंदाजीवर दिल्लीच्या संघाने हल्ला चढवत तब्बल 213 धावांचे लक्ष्य मुंबई समोर ठेवले. तर, दुसऱ्या सामन्यात मुंबईच्या संघाने अंतिम षटकांत बंगळुरूचा पराभव करत स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. तर, तिसऱ्या सामन्यात मुंबईला पराभवाची चव चाखावी लागल्याने ते गुणतालिकेत सहाव्या स्थानी फेकले गेले. त्यातच त्यांचा रनरेट ही कमी असल्याने ते खालून दुसऱ्या क्रमांकवरही फेकले जाण्याची शक्‍यता अधिक आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात त्यांना चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. त्यातच मुंबईच्या सलामीवीरांनी आणि मधल्या फळीतील युवराज सिंग, हार्दिक पांड्या यांनी चांगली कामगिरी केली असली तरी कायरन पोलार्ड आणि सूर्यकुमार यादव सातत्याने अपयशी होत असल्याने मुंबईच्या संघाला अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसीस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंह, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, कृणाल पांड्या, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, आदित्य तरे, मयांक मार्कंडे, राहुल चहर, अनुकूल रॉय, सिद्धेश लाड, क्विंटन डी-कॉक (यष्टीरक्षक), एविन लुईस, कायरॉन पोलार्ड, बेन कटींग, मिचेल मॅक्‍लेनघन, ऍडम मिल्ने, जेसन बेहरनडॉर्फ, बरिंदर सरन, युवराज सिंग, लसिथ मलिंगा, अनमोलप्रीत सिंह, पंकज जासवाल, रसिक सलाम.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.