सिध्दू तुम्ही राजकारण कधी सोडणार? लुधियानात झळकले पोस्टर्स!

मोहाली – अमेठीतून राहुल गांधी हरले तर राजकारण सोडेन, अशी वल्गना करणारे कॉंग्रेस नेते नवज्योतसिंग सिध्दू यांना राजकारण कधी सोडणार असा सवाल करणारे पोस्टर्स लुधियानातील पखवाल रोडवर झळकले आहेत. यापूर्वी असेच पोस्टर मोहालीत लागले होते.

भाजप सोडून कॉंग्रेसमध्ये आलेल्या नवज्योतसिंग सिद्धू यांचे आता कॉंग्रेसमध्ये देखील वाद होऊ लागले आहेत. सिध्दू यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्याशीच वाद ओढावून घेतल्यामुळे त्यांचे खाते बदलण्यात आले आहे. त्यामुळे सिध्दू हे सध्या नाराज आहेत. त्यातच आता अशा प्रकारचे पोस्टर्स झळकल्यामुळे सिद्धू यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे.

दरम्यान, लोकसभा2019 निवडणुकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील अमेठीतून पराभव स्वीकारावा लागला होता.अमेठीतून राहुल गांधी यांचा स्मृती इराणींनी 55,120 मतांनी आघाडी घेत पराभव केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.