विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस; शिंदे आणि पवार कोणाला संधी देणार?

Vidhan Parishad Election 2025 | विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी निवडणूक होणार आहे. येत्या 27 मार्च रोजी ही निवडणूक पार पडणार असून आज 17 मार्च रोजी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. यात महायुतीत भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत.
तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. त्यासाठी भाजपाकडून काल तीन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. मात्र अद्याप शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून नावं जाहीर करण्यात आलेली नाही.
दादाराव केचे, संजय केनेकर आणि संदीप जोशी यांना विधानपरिषदेसाठी भाजपने संधी दिली आहे. विधानपरिषदेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस असल्याने शिंदे गट आणि अजित पवार गटही त्यांचे उमेदवार जाहीर करतील.
राष्ट्रवादीकडून झीशान सिद्दीकी यांचं नाव चर्चेत
राष्ट्रवादीकडून विधानपरिषद उमेदवारासाठी झीशान सिद्दीकी यांचं नाव चर्चेत आहे. संजय दौंड आणि उमेश पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कागदपत्रं तयार ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. Vidhan Parishad Election 2025 |
शिंदे गटाकडून चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर
तर दुसरीकडे, शिवसेना शिंदे गटाकडून नंदुरबार शिवसेनेचे संपर्कप्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर आहे. माजी नगरसेवीका शितल म्हात्रे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे आणि नागपूरचे किरण तांडव यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे आता शिंदे आणि अजित पवार नेमकी कोणाला संधी देणार हे पहावे लागणार आहे.
हेही वाचा:





