Satara | श्री मंगलमुर्ती हॉस्पिटलचा आज अकरावा वर्धापन दिन

सातारा, (प्रतिनिधी) – ७ सप्टेंबर रोजी “गणेश चतुर्थी” दिवशी श्री मंगलमुर्ती क्लिनिक अँड रिसर्च सेंटर प्रा. लि . १२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. सामान्य हॉस्पिटल ते आजचे अत्याधुनिक सुसज्ज मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हा गेल्या अकरा वर्षांचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता.
ज्या वैद्यकीय सोयी-सुविधा सातारा येथे उपलब्ध नाहीत. पण खूप गरजेच्या आहेत. त्या सोयी सुविधा साताऱ्यातच परवडतील अशा दरात उपलब्ध व्हाव्यात ही काळाची गरज ओळखून श्री मंगलमूर्ती ग्रुपने त्यासाठी खूप कष्टाने सुसज्ज हॉस्पिटल उभारणीचे शिव धनुष्य लीलया पेलले आणि हजारो रुग्णांवर उपचार करण्यात यशस्वी झाले
.
श्री मंगलमूर्ती हॉस्पिटल हे आधुनिक आरोग्य सेवेचे आदर्श उदाहरण आहे फिलिप्स कंपनीच्या जागतिक दर्जाच्या फ्लॅट पॅनल कार्डियाक कॅथलॅब मध्ये अनेक हृदय रोगाच्या रुग्णांवर सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर भुषण पाटील हे अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, आयव्हीसी फिल्टर, पेस मेकर अशा प्रोसिजर करत असून आत्तापर्यंत साडेतीन हजार प्रोसिजरचा टप्पा यशस्वीपणे पार पडला आहे.
लहान मोठ्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया अचूकपणे करण्यासाठी सर्व संसाधनांनी सुसज्ज ऑपरेशन थिएटरमध्ये अस्थिरोग तज्ञ डॉ विकास पाटील व सर्जन डॉ. संदीप निकम हे सर्व प्रकारच्या ऑर्थोपेडिक व जनरल लॅप्रोस्कॉपिक एन्डोस्कोपिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करत आहेत.
नुकतेच या विभागात जर्मनीतील सर्वात अत्याधुनिक लेझर तंत्रज्ञान असलेले बायोलिटिक लेझर टॉप एंड 1470 मशीनचे अनावरण करण्यात आले.
हे साताऱ्यातील पहिले हाय एंड जर्मन लेझर मशीन आहे. ते सर्वात कॉम्पॅक्ट असून पाइल्स, फिशर, मुळव्याध, भगंदर, पायलोनिडस, सायनस, व्हेरिकोज व्हेन्स तसेच कॉस्मेटिक सर्जरी विना चिरफाड, विना रक्तस्त्राव वेदनाविरहित करता येतात.
रुग्णाला ऑपरेशननंतर फारसा त्रास होत नाही आणि त्याच दिवशी डिस्चार्ज केले जाते. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. संदीप निकम यांनी केले.
अद्ययावत आयसीयू, सेमी आयसीयू ,स्पेशल, सेमी स्पेशल, डीलक्स रूम व हवेशीर जनरल वॉर्ड मध्ये विशेष प्रशिक्षित अनुभवी इंटेन्सिव्हीस्ट कडून 24 तास निरीक्षण व प्रशिक्षित स्टाफकडून रुग्णांची देखभाल केली जाते.
24 तास ओपीडी मेडिकल पॅथॉलॉजी लॅब टू डी इको एक्स-रे सुविधा उपलब्ध असून प्रशिक्षित व सेवाभावी स्टाफ रुग्णास नम्र व तत्पर सेवा देण्यात कार्यरत असतो.
येथे नामांकित कंपनीच्या कॅशलेस व रिअम्बर्समेंट सुविधा उपलब्ध असून तीस किलोमीटर पर्यंत गरजू रुग्णांना मोफत ॲम्बुलन्स सुविधा देण्यात येते. तसेच विविध मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेतली जातात.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेतर्गत रुग्णांसाठी मोफत अँजिओप्लास्टी सुविधा उपलब्ध असून अनेक रुग्ण या सेवेचा लाभ घेत आहेत. तसेच किडनी रुग्णांसाठी मोफत डायलिसिस सुविधा हॉस्पिटलच्या सुसज्ज अशा डायलिसिस युनिटमध्ये उपलब्ध आहे.
याच सर्व अत्याधुनिक मशिनरी, सोयी सुविधा, तज्ञ वैद्यकीय टीम व प्रशिक्षित स्टाफ यांच्या कौशल्यामुळे हॉस्पिटलला चे मानांकन मिळाले आहे, जे आमच्यासाठी नक्कीच गौरवास्पद आहे.





