जगभरात गूगलचे नेटवर्क ठप्प…
Updated On:

नवी दिल्ली – जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेले गुगलचे नेटवर्क ठप्प (डाऊन) झाले आहे. तसेच जीमेल आणि यूट्यूबच्या सेवाही पूर्णपणे डाऊन झाल्या आहेत. डाउनडिटेक्टर यांच्या म्हणण्यानुसार, 14 डिसेंबर 2020 रोजी जीमेल दुपारी 4 वाजून 43 मिनिटांनी डाऊन झाले.
यानंतर, यूट्यूब देखील बऱ्याच वेळ डाऊन झाले. अनेक युजर्सना गुगल या सर्च इंजिनवर माहिती सर्च करताना अडचणी येत आहेत. त्याचवेळी बर्याच यूजर्सनी गुगल ड्राइव्हही बंद झाल्याची तक्रार केली आहे. जीमेल डाऊन झाल्यानंतर यूजर्सना 500 चा एरर मेसेज दिसत आहे.





