मुंबई – सुपरस्टार सलमान खानच्या चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अभिनेत्याची प्रसिद्ध फ्रेंचाइजी टायगर 1 आणि 2 रिलीज झाली आहे. चाहते या मालिकेतील तिसऱ्या चित्रपट ‘टायगर 3’ ची आतुरतेने वाट पाहत आहेत. सलमान खानने काही दिवसांपूर्वी टायगर 3 ची घोषणा केली होती. 2023 च्या दिवाळीला त्याचा ‘टायगर 3’ चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले आहे. या चित्रपटात कतरिना कैफ, सलमान खान आणि इमरान हाश्मी देखील दिसणार आहेत.
दरम्यान, हा चित्रपट प्रदर्शित होण्यापसूर्वीच चित्रपटातील शुटिंगचे काही सिन सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचं दिसून आलं आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मनीष शर्मा आहेत आणि चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा करत आहेत. टायगर 3 च्या सेटवरून व्हायरल झालेल्या या कथित व्हिडिओमध्ये धूर दिसत आहे, ज्यामुळे चाहते असा अंदाज लावत आहेत की हा एक अॅक्शन सीन आहे.
Emraan Hashmi from #Tiger3 🔥🔥Mahn look at his physique!!
Battle between him & Salman Khan will be treat to watch!! pic.twitter.com/Qk5NeTI0vE
— . (@Salman_Rules) February 24, 2023
तसेच याआधी, सलमान खानच्या अंडर-प्रॉडक्शन चित्रपट टायगर 3 च्या सेटवरून अभिनेत्याचा नवीन लूक इंटरनेटवर व्हायरल आला होता. ही छायाचित्रे रशियातील चित्रपटाच्या सेटवरील आहेत, जिथे सलमान खान आणि कतरिना कैफ शूटिंगसाठी गेले होते. त्याचवेळी, त्याचा लूक ओळखणे खूप कठीण होते. राखाडी-तपकिरी दाढी, लांब केस, पांढरा शर्ट, निळी जीन्स आणि लाल जॅकेट घातलेला सलमान यामध्ये दिसत होता. आणि आता पुन्हा एकदा चित्रपटातील काही कथित सिन देखील व्हायरल झाल्याचं सांगण्यात आलं आहे.