“पुढे झेप घेण्यासाठी…”, दुखापतीनंतर अमोल कोल्हेंनी प्रकृतीसंदर्भात दिली अपडेट

मुंबई – अभिनेते आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीला काही दिवसांपूर्वी दुखापत झाली होती. 1 मे रोजी महाराष्ट्र दिना दिवशी कराडमध्ये महानाट्याचा प्रयोग होता या प्रयोगावेळी ही दुर्घटना घडली. त्यांना दुखापत झाल्यानंतर चाहत्यांनी देखील त्यांच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली. सध्या ते रुग्णालयात दाखल असून नुकतेच त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे.
अमोल कोल्हे यांनी स्वत: सोशल मीडियावर रुग्णालयातील एक फोटो शेअर केला आहे. तर पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “काळजी करण्याचं कारण नाही! पुढे झेप घेण्यासाठी दोन पावलं मागे यावं लागतं. थोडीशी सक्तीची विश्रांती. परंतु दुखापत फार गंभीर नाही. थोडीशी सक्तीची विश्रांती… परंतु दुखापत फार गंभीर नाही.. लवकरच भेटू.. 11 मे ते 16 मे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स ग्राउंड, पिंपरी येथे *”शिवपुत्र संभाजी”* महानाट्य!!! ” अशा शब्दात कोल्हे यांनी आपल्या भावना व्यक्त करत पुन्हा एकदा काम करण्यास सज्ज होणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
दरम्यान, रविवारी 30 एप्रिल रोजी, रात्री कराड येथे शिवपुत्र संभाजी महानाट्याच्या प्रयोग सुरू होता. मात्र अमोल कोल्हे यांची घोड्यावरून एन्ट्री होतानाच घोड्याचा पाय दुमडला गेला. ज्यामध्ये अमोल कोल्हे घोड्यावरून खाली कोसळले आणि त्यांच्या पाठीला जबर मार बसला. त्यानंतरही त्यांनी प्रयोग सुरू ठेवला. पण दुखापत मोठी असल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागले. 1 मे महाराष्ट्र दिनाचा प्रयोग करून ते रुग्णालयात दाखल झाले होते.





