कात्रज – मुंबई येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची महाराष्ट्र राज्य वाहन मालक-चालक संघ प्रतिनिधींनी संघाचे अध्यक्ष बाबा शिंदे यांच्यासह भेट घेत समस्या मांडल्या.
दि. 31 मार्च 20 21 पर्यंत कर्ज हप्ता भरण्याकरीता मुदत द्यावी. याकामी बॅंक व फायनान्स कंपन्यांना पत्र पाठवू, असे आश्वासन यावेळी ठाकरे यांनी दिले.
यावेळी संजय नाईक, दया नाटकर, अनिल गर्ग, प्रवीण पैठणकर, संजय घोलप, किरण देसाई उपस्थित होते.