Atharva Sudame : गणेशत्सवाच्यावेळी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे एका रीलमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. रील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टोर्लसकडून टीका करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा एका रीलमुळे अथर्व सुदामे अडचणीत सापडला आहे. यावेळी त्याला पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटीसमध्ये व्हिडीओबाबत अथर्व सुदामेने लेखी खुलासा करावा, असे म्हटले आहे. तसेच सोशल मीडियावरुन संबंधित व्हिडीओ हटविण्यास सांगण्यात आले असून तसे न केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आला आहे. नेमकं कारण काय? मिळालेल्या माहितीसनुसार, पूर्वपरवानगी न घेता पीएमपीच्या बसमध्ये रिल्स काढून या रीलमध्ये महामंडळाचा गणवेश, ई-मशीन आणि बॅच बिल्ला यांचा बेकायदेशीर वापर करण्यात आला आहे. या प्रकरणी पीएमपी प्रशासनाकडून अथर्व सुदामेला नोटीस बजाविण्यात आली आहे. पीएमपीच्या नोटीसमध्ये अथर्व सुदामेने व्हिडीओमुळे पीएमपीची प्रतिमा मलीन होत असल्याचे देखील म्हटले आहे. View this post on Instagram A post shared by Atharva Sudame (@atharvasudame) गणेशोत्सवाच्यावेळी अथर्व सुदामेला हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणाऱ्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले होते. त्यानंतर संबंधित रिल त्याला हटवावे लागले. आता पुन्हा एकदा रीलमुळेच अथर्वची अडचण वाढली असून यावेळी त्याला थेट कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. हेही वाचा : “RSS हा कोणाचाही रिमोट कंट्रोल नाही, संघाला भाजपच्या..” ; मोहन भागवत यांचे मोठे विधान