\n

२०२२ पासून हे कार्यालय तृणमूल काँग्रेसचे राज्यस्तरीय कार्यालय म्हणून वापरले जात आहे. ईएम बायपासलगत असलेल्या मूळ पक्ष कार्यालयाच्या पुनर्बांधणीमुळे पक्षाचे कामकाज या इमारतीत हलविण्यात आले होते.

\n

बंडखोर गटाचे नेते संदीपान साहा यांनी, “हे आमचे कार्यालय असून त्याची जबाबदारीही आमचीच आहे. पक्षाच्या पुढील सर्व संघटनात्मक हालचाली याच कार्यालयातून केल्या जातील,” असे सांगितले.

\n

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे आमदार सोवनदेब चट्टोपाध्याय यांनी या घटनेचा निषेध करत, “हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आणि कायद्याच्या विरोधात आहे. कार्यालयावर जबरदस्तीने ताबा मिळविण्याचा हा प्रयत्न असून याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट केले.

\n
\n

Kolkata, West Bengal: On the TMC party office, TMC MLA Sovandeb Chattopadhyay says, “It is totally wrong and against the law. It is an attempt to forcibly occupy it, and we should look into the matter…” pic.twitter.com/c40j2tSdRk

\n

— IANS (@ians_india) July 3, 2026

\n

\n

दरम्यान, भाजप नेत्या केया घोष यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पक्षातील संघर्ष हा पक्षनिधी आणि संघटनात्मक नियंत्रणावरून असल्याचा दावा त्यांनी केला. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह कोणत्या गटाला मिळणार, याबाबतचा अंतिम निर्णय आता निवडणूक आयोगाकडून होणार आहे.

\n

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वर्चस्वाची लढाई उघडपणे समोर आली असून आगामी काळात निवडणूक आयोगाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"West Bengal : ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का! टीएमसी मुख्यालयासह पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्हावर बंडखोर गटाचा दावा","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/05/News-2026-05-24T185839.373.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Dnyaneshwar Phad","url":"https://www.dainikprabhat.com/author/dnyaneshwarphadeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/tmc-rebel-faction-ritabrata-banerjee-takes-control-of-kolkata-headquarters#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/05/News-2026-05-24T185839.373.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/tmc-rebel-faction-ritabrata-banerjee-takes-control-of-kolkata-headquarters#webpage","name":"West Bengal : ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का! टीएमसी मुख्यालयासह पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्हावर बंडखोर गटाचा दावा","url":"https://www.dainikprabhat.com/tmc-rebel-faction-ritabrata-banerjee-takes-control-of-kolkata-headquarters","inLanguage":"mr","description":"West Bengal : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला असून पक्षातून निष्कासित करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाने कोलकात्यातील पक्षाच्या संघटनात्मक मुख्यालयावर दावा केला आहे.","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/tmc-rebel-faction-ritabrata-banerjee-takes-control-of-kolkata-headquarters#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/05/News-2026-05-24T185839.373.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/tmc-rebel-faction-ritabrata-banerjee-takes-control-of-kolkata-headquarters#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/tmc-rebel-faction-ritabrata-banerjee-takes-control-of-kolkata-headquarters","name":"West Bengal : ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का! टीएमसी मुख्यालयासह पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्हावर बंडखोर गटाचा दावा"}}]}}}

West Bengal : ममता बॅनर्जींना सर्वात मोठा धक्का! टीएमसी मुख्यालयासह पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्हावर बंडखोर गटाचा दावा

West Bengal : पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र झाला असून पक्षातून निष्कासित करण्यात आलेले आमदार ऋतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गटाने कोलकात्यातील पक्षाच्या संघटनात्मक मुख्यालयावर दावा केला आहे.

Updated On:

या गटाने आपणच ‘खरी तृणमूल काँग्रेस’ असल्याचा दावा करत पक्षाच्या नाव व निवडणूक चिन्हावरही हक्क सांगितला आहे. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत गटाने हा दावा फेटाळून लावत तो बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे.

बंडखोर गटाने शुक्रवारी पक्षाच्या कार्यालयात प्रवेश करून तेथे बैठक घेतली. कार्यालयाबाहेर लावण्यात आलेल्या फलकावर पक्षाध्यक्ष म्हणून ममता बॅनर्जी यांच्याऐवजी अरूप रॉय यांचे नाव नमूद करण्यात आले होते. बैठकीनंतर ऋतब्रत बॅनर्जी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यालयाला कुलूप लावून चावी ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला.

२०२२ पासून हे कार्यालय तृणमूल काँग्रेसचे राज्यस्तरीय कार्यालय म्हणून वापरले जात आहे. ईएम बायपासलगत असलेल्या मूळ पक्ष कार्यालयाच्या पुनर्बांधणीमुळे पक्षाचे कामकाज या इमारतीत हलविण्यात आले होते.

बंडखोर गटाचे नेते संदीपान साहा यांनी, “हे आमचे कार्यालय असून त्याची जबाबदारीही आमचीच आहे. पक्षाच्या पुढील सर्व संघटनात्मक हालचाली याच कार्यालयातून केल्या जातील,” असे सांगितले.

दुसरीकडे, तृणमूल काँग्रेसचे आमदार सोवनदेब चट्टोपाध्याय यांनी या घटनेचा निषेध करत, “हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आणि कायद्याच्या विरोधात आहे. कार्यालयावर जबरदस्तीने ताबा मिळविण्याचा हा प्रयत्न असून याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे स्पष्ट केले.

दरम्यान, भाजप नेत्या केया घोष यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना तृणमूल काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. पक्षातील संघर्ष हा पक्षनिधी आणि संघटनात्मक नियंत्रणावरून असल्याचा दावा त्यांनी केला. पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह कोणत्या गटाला मिळणार, याबाबतचा अंतिम निर्णय आता निवडणूक आयोगाकडून होणार आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे तृणमूल काँग्रेसमधील अंतर्गत वर्चस्वाची लढाई उघडपणे समोर आली असून आगामी काळात निवडणूक आयोगाची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Teacher Award 2026 : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील 'या' 2 शिक्षिकांचा समावेश

2026-08-21 22:06:22

Teacher Award 2026 : राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर; महाराष्ट्रातील 'या' 2 शिक्षिकांचा समावेश

BJP News : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का; बार कौन्सिल निवडणुकीत TMC चे एकहाती वर्चस्व

2026-08-19 18:53:12

BJP News : पश्चिम बंगालमध्ये भाजपला मोठा धक्का; बार कौन्सिल निवडणुकीत TMC चे एकहाती वर्चस्व

Mahua Moitra Security Controversy: 'बाहेर रक्तपिपासू लोक...' ; महुआ मोईत्राच्या सुरक्षेच्या समर्थनार्थ शशी थरूर सरसावले

2026-08-16 13:23:21

Mahua Moitra Security Controversy: 'बाहेर रक्तपिपासू लोक...' ; महुआ मोईत्राच्या सुरक्षेच्या समर्थनार्थ शशी थरूर सरसावले

Ashish Banerjee: ममतांचे जवळचे सहकारी आशिष बॅनर्जी यांनी संपवलं आयुष्य ; सुसाईड नोटमध्ये काय लिहिले होते?, वाचा

2026-08-16 12:01:50

Ashish Banerjee: ममतांचे जवळचे सहकारी आशिष बॅनर्जी यांनी संपवलं आयुष्य ; सुसाईड नोटमध्ये काय लिहिले होते?, वाचा

Bang Vibhushan Award : भाजप खासदार नागेंद्रनाथ रॉय यांचा बंग विभूषण पुरस्कार घेतला माघारी; बंगाल सरकारचे मोठे पाऊल

2026-08-13 21:23:06

Bang Vibhushan Award : भाजप खासदार नागेंद्रनाथ रॉय यांचा बंग विभूषण पुरस्कार घेतला माघारी; बंगाल सरकारचे मोठे पाऊल