Dhurandhar Title Track :अभिनेता रणवीर सिंह याचा बहुचर्चित धुरंधर सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या अनोख्या ट्रेलरने प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. आता या सिनेमाचे टायटल ट्रॅक प्रदर्शित झाले असून, प्रेक्षक टायटल ट्रॅकला खूप पसंत करत आहेत. यामधून रणवीरचा लुक आणखी जास्त रिव्हील करण्यात आला आहे. अभिनेता रणवीर सिंह त्याच्या आगामी “धुरंधर” सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचा पहिला लुक प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. निर्मात्यांनी २ मिनिटे ३९ सेकंदांचे हे गाणे प्रदर्शित केले आहे, या गाण्याचे “ना दे दिल परदेसी नु…” असे बोल आहेत. या गाण्यामध्ये अभिनेता रणवीर सिंहचा खतरनाक अवतार लक्ष वेधून घेत आहे. या अवतारात तो पूर्ण अॅक्शन मोडमध्ये दिसत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य धर यांनी केले आहे. पाकिस्तानात राहून दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या गुप्तहेराची भूमिका रणवीर सिंहने साकारली आहे. धुरंधर सिनेमा ५ डिसेंबर रोजी थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात आर. माधवन, अक्षय खन्ना, संजय दत्त, अर्जुन रामपाल आणि सारा अर्जुन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.