Titan Company Share : टायटन कंपनीचा शेअर कोसळला

मुंबई : टायटन या कंपनीचा शेअर मंगळवारी 6 टक्क्यांनी कोसळून या शेअरची किंमत 3,440 रुपये प्रति शेअर या पातळीवर गेली होती. यामुळे कंपनीचे बाजार मूल्य एकाच दिवसात 20,086 कोटी रुपयांनी कमी होऊन 3.05 लाख कोटी रुपयांवर गेले आहे. कंपनीच्या कामकाजाबाबत गुंतवणूकदार नाराज झाल्यामुळे या शेअरची विक्री होऊन शेअरचे भाव पडले असल्याचे सांगण्यात आले.
सेन्सेक्स संदर्भात ही कंपनी महत्त्वाची असल्यामुळे आणि या शेअरचा भाव कमी झाल्यामुळे याचा या निर्देशांकावर बराच दबाव आला होता. टाटा समूहातील या कंपनीने शेअर बाजाराला कळविलेल्या माहितीत म्हटले आहे की, पहिल्या तिमाहित कंपनीचा महसूल 20 टक्क्यानी वाढला. मात्र यापेक्षा जास्त उलाढाली अपेक्षा गुंतवणूकदारांना होती. त्यामुळे गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या शेअरची विक्री केली
या तिमाहीमध्ये देशांतर्गत दागिने विक्री 18 टक्क्यानी वाढली आहे. या कालावधीत सोन्याच्या किमती एकतर जास्त होत्या किंवा अस्थिर होत्या. तरीही कंपनीने दागिन्याची विक्री वाढविण्यात यश मिळविले आहे. कंपनीने या तिमाहीमध्ये नवीन 19 दालने उघडली आहेत.




